वृत्तसंस्था
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून कोरोना संक्रमण वाढत असल्याने आता शहरातील शाळा बंद करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. Will schools in Pune be closed again? Mayor reviews corona situation in the city
कोरोना, ओमीक्रोन संसर्ग वाढल्यास परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टींने मोहोळ यांनी तयारीचा आढावा घेतला. कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुले महापौर मुरलीधर मोहोळ हे जिल्हा प्रशासनाला पालक आणि डॉक्टरांच्या मागणीनुसार शाळा बंद ठेवण्याची आणि ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याची विनंती करतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. “कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आणि गेल्या एका आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या चौपट वाढली आहे. त्यामुळे आढावा घेण्यात आला,” असे महापौर म्हणाले.
महापौर म्हणाले, नवीन संक्रमित रूग्णांपैकी ९० टक्के पूर्णपणे लसीकरण झाले आहेत आणि त्यापैकी बहुतेक लक्षणे नसलेले आहेत. फार कमी रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज भासत आहे. २,५०० सक्रिय रुग्णांपैकी ३४० जण रूग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी १९० रूग्ण सामान्य स्थितीत आहेत.“आम्ही अतिरिक्त निर्बंध आणण्याच्या बाजूने नाही. त्याऐवजी, मास्क वापरण्याच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी दोन्ही डोससह नागरिकांनी प्रवेश केला पाहिजे.”
Will schools in Pune be closed again? Mayor reviews corona situation in the city
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- दारूचे ठेके देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतली ५०० कोटी रुपये लाच, जुने सहकारी कवी कुमार विश्वास यांचाच आरोप
- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराला पोलीसांचा दणका, पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक
- तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा