विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे निवृत्ती नाट्य घडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नव्या पदाची चर्चा सुरू झाली आहे. स्वतः शरद पवारांनी त्या संदर्भात खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कुठली जबाबदारी त्यांना द्यायला हरकत नाही. पण पण ती जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी पाहिजे. सध्या सुप्रिया सुळे बारामतीच्या लोकसभा मतदारसंघावर कॉन्सन्ट्रेट करत आहेत. त्या निवडणुकीनंतर शांतपणे विचार करून निर्णय घेऊ, असे शरद पवार टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. Why supriya sule is reluctant to hold responsibility of NCP working presidentship, due to fear of defeat in baramati
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्यातील उमेदवाराचा पराभव करायचा असा चंग भाजपने बांधला आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. निर्मला सीतारामन यांचे या लोकसभा मतदारसंघात तीन दौरे देखील झाले आहेत. भविष्यात भाजपचे नेते बारामती मतदारसंघावर वेगवेगळे “राजकीय प्रयोग” करण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये आपला “राहुल गांधी” होण्याची भीती सुप्रिया सुळे यांना वाटत आहे का??, अशी सुप्त चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राहुल गांधी यांचा 2019 च्या निवडणुकीत अमेठी मतदारसंघात पराभव झाला. मात्र त्यांनी वेळीच हा पराभव ओळखून केरळच्या वायनाडमध्ये अर्ज दाखल केला होता आणि ते वायनाड म्हणून लोकसभेत पोहोचले होते. परंतु भाजपने आपली सर्व ताकद एकवटून जसा अमेठीत राहुल गांधींचा पराभव घडवून आणला, तसा सुप्रिया सुळे यांचा पराभव घडवून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदाची किंवा अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यात सुप्रिया सुळे अडखळत आहेत, अशी चर्चा आहे.
त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आधी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पुन्हा निवडून येण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. त्यानंतरच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदाची अथवा अन्य कुठली जबाबदारी स्वीकारण्याची त्यांनी तयारी चालविल्याचे शरद पवारांच्या वक्तव्यातून सूचित होते.
मात्र शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीने खूप प्रयत्न करूनही सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव होऊन त्यांचा “राहुल गांधी” झालाच, तर भविष्यात त्या राष्ट्रवादीमध्ये कोणती भूमिका अथवा जबाबदारी स्वीकारतील??, या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप अनुत्तरीत आहे.
Why supriya sule is reluctant to hold responsibility of NCP working presidentship, due to fear of defeat in baramati
महत्वाच्या बातम्या
- बजरंग दलावरील बंदीचे आश्वासनामुळे काँग्रेसचीच कोंडी, खरगे यांना मिळाली 100 कोटींची कायदेशीर नोटीस, आता म्हणताहेत ‘जय बजरंग बली’
- Satyapal Malik Profile : 4 पक्ष सोडून भाजपमध्ये आले सत्यपाल मलिक, एकदाच जिंकली लोकसभा निवडणूक, वाचा 50 वर्षांचा राजकीय प्रवास
- भाजपविरोधातील ‘रेट कार्ड’ जाहिरातींवर निवडणूक आयोगाने काँग्रेसला पाठवली नोटीस, द्यावे लागणार उत्तर
- पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता; पण अजित पवारांच्या वर्तणूकीमुळे निर्णय फिरवला; राज ठाकरेंचा दावा