• Download App
    काँग्रेस भुईसपाट झाली, त्या मागचा अदृश्य हात पवारांचा आहे काय...??; आव्हाड तेच सांगताहेत का...??; आशिश शेलारांचा खोचक सवाल West bengal assembly elections 2021 results reactions, ashish shelar targets sharad pawar and congress

    काँग्रेस भुईसपाट झाली, त्या मागचा अदृश्य हात पवारांचा आहे काय…??; आव्हाड तेच सांगताहेत का…??; आशिश शेलारांचा खोचक सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजय मिळविला. या विजयात ज्येष्ठ नेते शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यावरून भाजपचे नेते आमदार आशिश शेलार यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे. बंगालमध्ये ममता विजयी झाल्या असल्या तरी काँग्रेस भुईसपाट झाली. त्यामागचा अदृश्य शक्ती किंवा अदृश्य हात जितेंद्र आव्हाड सांगत आहेत का…, असा खोचक सवाल आशिश शेलारांनी केला आहे. West bengal assembly elections 2021 results reactions, ashish shelar targets sharad pawar and congress

    जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलताना शेलार म्हणाले, यशामध्ये आता दावेदार कोण? छुपे, आडवे, उभे हात कोणाचे हे ज्यांचे निवडणूक चिन्ह हात आहे त्यांनी ठरवावे. आव्हाड असे म्हणत असतील तर ती अदृश्य शक्ती आणि हात कोणाचा असेल याची चिंता काँग्रेसला जास्त करावी लागेल. आव्हाडांनी दिशादर्शन केलेच आहे. काँग्रेस भुईसपाट झाली आहे. काँग्रेसला भुईसपाट करण्याच्या यशमागचा आनंद आणि अदृश्य शक्ती आव्हाड सांगत आहेत का हा प्रश्न आहे”.

    -आव्हाडांचे बहुचर्चित ट्विट

    तत्पूर्वी, “पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..! “शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.” याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता,” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केले होते.

    West bengal assembly elections 2021 results reactions, ashish shelar targets sharad pawar and congress

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ