Yedeshwari factory : मुसळधार पावसाने येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामातील 30 हजार साखरेचे पोते पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे. कारखान्याचे संचालक बजरंग सोनवणे यांनी माहिती दिली. बीडच्या केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने, 30 हजार साखरेचे पोते पाण्यानं भिजली आहेत. यामध्ये पंधरा हजार क्विंटल साखर भिजल्याने लाखोंचं नुकसान झालंय. येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. आणि हीच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेलीय. गोदामातील पाणी काढण्यासाठी 40 ते 50 कामगार प्रयत्न करत होते. अर्ध्या तासात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. सध्या पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. Watch In Beed 30000 bags of sugar got Wet in Yedeshwari factory due to rains
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वेकडून कोरोना सेन्सेटिव्ह कोचची निर्मिती, हवेतच व्हायरसचा खात्मा करणार प्लाझ्मा एअर थेरपी
- कोरोना महामारीतील मृत्यूंमुळे भारतीय तरुण झाले सजग, जीवन विम्याच्या मागणीत वाढ
- Deep Ocean Mission : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून समुद्र ‘मंथना’ला मंजुरी, डीएपीवर सबसिडी 700 रुपयांनी वाढवली
- Vivatech Summit : पीएम मोदी म्हणाले- भारतात स्टार्टअपसाठी चांगले वातावरण, गुंतवणूकदारांना ऑफर
- गाझियाबाद प्रकरण : एसएसपी म्हणाले- घटनेत धार्मिक अँगल नाही, इतर आरोपींचा शोध सुरू