Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt : राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून ठोस माहिती सादर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आठ वेळा तारीख वाढवून घेतली. मात्र काहीच केले नाही. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकांतील ओबीसींचे सगळेच आरक्षण गेल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही महाविकास आघाडी सरकारने तेच केले. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा आहे असे जरी गृहीत धरले, तरी राज्य सरकारला मागासवर्ग आयोग स्थापून कॅबिनेटमध्ये त्या समाजाला मागास दर्जा देऊन तसा प्रस्ताव केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागतो, परंतु या सरकारने हेही केले नाही. या सरकारला मुळात मराठा समाजालाही आरक्षण द्यायचे नाही, कारण ज्याला काम करायचे असते तो कारणं सांगत बसत नाही, असा आरोपही विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला. WATCH Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Unlock Confusion In Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- Juhi Chawla 5G Plea : 5G प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा जुही चावलाला दणका, याचिका फेटाळत 20 लाखांचा दंड
- Maratha Reservation : भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेकडे राज्याचे लक्ष
- लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक
- पंजाबात व्हॅक्सिन घोटाळा!, कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1096 रुपयांना विक्री केल्याचा आरोप