bjp mla gopichand padalkar : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राज्यातील ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सत्तेत आल्यापासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार बहुजनांच्या आरक्षणाच्या मुळावर उठले असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. शरद पवार यांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नतीतील आरक्षण संपवणारा सरकारी वकील कोण? असा प्रश्नही पडळकरांनी उपस्थित केला आहे. आमदार पडळकरांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा, धनगर, ओबीसी आणि पदोन्नती आरक्षण देण्यात अपयशी ठरलंय. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. शरद पवारांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नती आरक्षण संपवणारा सरकारी वकील कोण? असा सवाल करत पडळकरांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. watch bjp mla gopichand padalkar criticizes sharad pawar and thackeray government
महत्त्वाच्या बातम्या
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी
- चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला
- ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले
- GST Collection : मे महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये 65 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत किती आले जाणून घ्या
- Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलापासून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण