सकाळी 11 वाजता मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. विमानाला पुशबॅक देणाऱ्या ट्रॅक्टरला येथे आग लागली. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला धक्का देणाऱ्या वाहनाला (ट्रॅक्टर) अचानक आग लागली. V26R स्टँडवर हा अपघात झाला. हे वाहन मुंबई ते जामनगरच्या फ्लाइटला पुशबॅक देणार होते. वाहनाला आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. WATCH A pushback tug caught fire at Mumbai airport earlier today; fire under control now Airport operations normal
वृत्तसंस्था
मुंबई : सकाळी 11 वाजता मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. विमानाला पुशबॅक देणाऱ्या ट्रॅक्टरला येथे आग लागली. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला धक्का देणाऱ्या वाहनाला (ट्रॅक्टर) अचानक आग लागली. V26R स्टँडवर हा अपघात झाला. हे वाहन मुंबई ते जामनगरच्या फ्लाइटला पुशबॅक देणार होते. वाहनाला आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.
एअर इंडियाच्या फ्लाइट AIC-647 मुंबई जामनगरला पुशबॅक करत असताना अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी विमानात 85 लोक होते. आग लागल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता. मात्र, विमानतळ प्रशासनाने तत्परता दाखवत आग शमवली. विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. विमानाने 12.04 वाजता उड्डाण केले.
विमानाला धक्का देणारे वाहन ट्रॅक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडियाच्या या विमानाला पुशबॅक करण्यासाठी हा ट्रॅक्टर आणण्यात आला होता. हा ट्रॅक्टर विमानाच्या अगदी जवळ उभा होता. त्यानंतर अचानक आग लागली. आग कशी लागली याबाबत प्राधिकरणाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. ही घटना नवी आहे. मात्र, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने इतर कोणतीही हानी झाली नाही.
WATCH A pushback tug caught fire at Mumbai airport earlier today; fire under control now Airport operations normal
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांचा तुरुंगवास, अनेक गंभीर आरोप
- न्यूयॉर्कमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, ९ मुलांसह १९ जणांचा मृत्यू, वाचा सविस्तर..
- Goa Election : गोव्यात भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी दिला पदाचा राजीनामा
- मुंबई पोलिसांवर कोरोनाचे गडद सावट, ४८ तासांत २ पोलिसांचा मृत्यू, ८ दिवसांत ५२३ जण बाधित