दिल्लीतून काँग्रेस हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केला
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली हायकमांडने अखेर यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्यापासून रिक्त असलेल्या या पदासाठी अखेर चेहरा मिळाला आहे. विधीमंडळात पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलेला आहे. Vijay Wadettiwar was elected as the Leader of the Opposition in Maharashtra
काँग्रेस हायकमांडने जरी विजय वड्डेटीवारांना विरोधी पक्षनेता केले असले तरी विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी ही बाळासाहेब थोरातांकडेच राहणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सुरुवातीस राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांच्या नावांची चर्चा होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे आणि सुनील केदार यांचीही नावे पुढे आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात जवळपास ३५ आमदांनी बंडखोरी करत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्याने, राष्ट्रवादींच्या आमदारांचे संख्याबळ कमी झाले होते. परिणामी विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा ठोकण्यात आला होता. ज्यास महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांची हरकत नव्हती.
Vijay Wadettiwar was elected as the Leader of the Opposition in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!