Vijay Wadettiwar : ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले.