• Download App
    Varun Sardesai Shiv Sena UBT Rajya Sabha Seat Sharad Pawar VIDEOS ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंची भूमिका- शरद पवार मोठे नेते, पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही

    Varun Sardesai : ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंची भूमिका- शरद पवार मोठे नेते, पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही

    Varun Sardesai

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Varun Sardesai शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडण्यास ठाम नकार दिला आहे. आम्ही राज्यसभेच्या जागेवरील आमचा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आमच्या आमदारांनी आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे, असे ते म्हणालेत.Varun Sardesai

    राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 तारखेला निवडणूक होणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. या जागेवर ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. पण शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तर ठाकरे गट माघार घेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही ही जागा शरद पवारांसाठी सोडण्यास ठाम विरोध दर्शवला आहे.Varun Sardesai



    काय म्हणाले वरुण सरदेसाई?

    वरुण सरदेसाई या प्रकरणी बोलताना म्हणाले, आम्ही राज्यसभेच्या जागेवरील आमचा दावा कोणत्याही स्थितीत सोडणार नाही. आमच्या पक्षाच्या आमदारांनी आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे. 2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. त्यानंतर आम्ही संजय पावार यांना उमेदवारी दिली होती. पण त्यावेळी संख्याबळ असतानाही त्यांचा पराभव झाला होता. आता आमचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे आमचा एखादा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा एखादा उमेदवार राज्यसभेवर जाईल.

    शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते उमेदवार म्हणून इच्छुक असतील. त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसे दावे केले जात असले तरी आम्ही आमच्या राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नाही, असे ते म्हणाले. वरुण सरदेसाई यांनी यावेळी विधान परिषदेच्या जागेवरही दावा केला. विधान परिषद व राज्यसभा या दोन वेगवेगळ्या जागा आहेत. दोन वेगवेगळे विषय आहेत. विधानपरिषदेची जागा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्यामुळे रिक्त होत आहे. अर्थात ती जागाही आमचीच असेल, असे ते म्हणाले.

    आदित्य ठाकरेंची एमव्हीएच्या बैठकीला दांडी

    महाविकास आघाडीने राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना दोनदा बोलावले होते. पण आदित्य ठाकरेंनी या बैठकीपासून अंतर राखले. राज्यसभेची जागा ठाकरे गटाला मिळावी या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यानंतर आता वरुण सरदेसाई यांनीही या प्रकरणी कडवट भूमिका घेतली आहे. त्यामु्ळे शरद पवार राज्यसभेवर जाणार किंवा नाही याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

    आत्ता पाहू महाराष्ट्रातील कोणते नेते होणार निवृत्त?

    राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 खासदारांचा येत्या 2 एप्रिल रोजी कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यात शरद पवारांसह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, खासदार धैर्यशील मोहन पाटील, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेस खासदार रजनी पाटील व शरद पवार गटाच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांचा समावेश आहे.

    Varun Sardesai Shiv Sena UBT Rajya Sabha Seat Sharad Pawar VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pankaja Munde : IAS एम. देवेंद्र सिंग निलंबित! मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे पडले महागात, अधिवेशन काळातच कारवाई

    Anna Hazare : आपला देश न्यायव्यवस्थेवर चालतो, अरविंद केजरीवाल प्रकरणी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

    Raj Thackeray : अजित पवारांच्या विमान अपघातामागे काळेबेरे? राज ठाकरेंचीही FIR दाखल करून घेण्याची मागणी