विशेष प्रतिनिधी
पुणे : Vande Bharat Express पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.Vande Bharat Express
वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरल्याची पहिलीच घटना
पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, तेव्हा ट्रेनला किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. वंदे भारत ट्रेनमधील सी 15 या कोचमधील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.Vande Bharat Express
दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा कोच रुळावरुन घसरल्याची ही पहिलीच घटना आहे, यापूर्वी वंदे भारत ट्रेन अचानक बंद पडल्याने दुसऱ्या इंजिनने तिला नेण्यात आले होते.
घटनेबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा आज संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर प्रवेश करत असताना रुळावरून घसरल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही. नियमित वेळेनुसार स्थानकात येत असताना अचानक डब्याची चाके रुळाखाली गेल्याचे दृश्यांमधून समोर आले असून, रेल्वे प्रशासनाकडून सध्या युद्धपातळीवर डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या अनपेक्षित घटनेमुळे पुणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.
Vande Bharat Express Derails at Pune Station; All Passengers Safe
महत्वाच्या बातम्या
- ममतांच्या प्रचारासाठी फक्त केजरीवाल; बाकीचे प्रादेशिक नेते गपगार!!
- FM Araghchi ; इराणचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर; दोन दिवसांतील दुसरा दौरा
- मुंबई – पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या सेवेसाठी खुला; घाटातल्या वाहतूक कोंडीला कायमचा आळा!!
- K. Kavitha : तेलंगणात नवा राजकीय ट्विस्ट: कविता यांचा स्वतंत्र पक्ष, केसीआरसमोर घरातूनच आव्हान