विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Ambedkar राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षाने अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.Prakash Ambedkar
वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार दर्शवली आहे. त्यावरही काँग्रेसकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंबेडकरांनी आता थेट प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, काही प्रश्न उपस्थित केले आहेत.Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर यांची सोशल मीडिया पोस्ट
प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर पक्षांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत! हे मी २१ मे रोजी सांगितले होते आणि माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनी सुद्धा १८ जून रोजी तेच सांगितले होते. पण, आजपर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी संपर्क साधलेला नाही!
प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त करत थेट भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. तसेच भाजपकडे काँग्रेसविषयी असं काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपला घाबरत आहे? असाही सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस वंचितशी युती करणार का?
दरम्यान, राज्यात भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. विशेषत: दलित, ओबीसी आणि वंचित घटकांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये आघाडीचे गणित काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आज उपस्थित केलेल्या शंकेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी काँग्रेस दाखवते का? हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Prakash Ambedkar Questions Congress: Alliance Due To BJP Pressure?
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi : मैदानावरही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच – भारत विजयी, पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक
- Owaisi Rally : बिहारमध्ये ओवैसींच्या रॅलीत ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर्स; म्हणाले – आपल्या हक्कांसाठी राजकीय नेतृत्व मजबूत करावे लागेल
- BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार
- रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!