ये नरेंद्र दे रे दे सिलेंडर…. ये नरेंद्र दे रे दे सिलेंडर….!!
नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर? राज्यव्यापी आंदोलन औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर?” या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर? राज्यव्यापी आंदोलन औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर?” या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात सुरूवातीला “बिनविरोध” निवडणुकीची चर्चा झाली. पण जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी वाढताना दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची” घोषणा करण्यात आली.
ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली.
वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!, असला विचित्र प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हँडल वरून समोर आला.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन निवडणुका लढवायचा प्रयोग केला, पण त्याला फार मर्यादित यश मिळाले. महापालिकांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसने वेगळा मार्ग पत्करून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ओबीसी बहुजन आघाडीशी युती केली. त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी सुद्धा ओबीसी आरक्षण वाजवायच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानावर आली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांनी एकत्रित निवडणूक लढवायची घोषणा केली. पण याला सेक्युलर फ्रंट असे नाव दिले असले, तरी त्या फ्रंट मध्ये प्रत्यक्षात इस्लाम पक्ष सामील झाला. त्यामुळे मालेगावातल्या सेक्युलर आघाडी विषयी राजकीय संशय बळावला.
राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील,” असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ओबीसी लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने हाती घ्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत ओबीसीने आरक्षणवादी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सवर्णांना मतदान करण्याऐवजी एससी-एसटी उमेदवारांना आणि ते नसतील तर मुस्लिमांना मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात पार पडले. या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षाने अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Vanchit Bahujan Aghadi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी आघाडी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या […]
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बायपासनंतर ते तीन महिने विश्रांती घेणार असून यादरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक […]