नाशिक : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर आलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेत. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य फार मोठे आहे. काश्मीर मधल्या दहशतवाद्यांनी बऱ्याच दिवसांनी विषारी फणा वर काढताना अमेरिकन उपाध्यक्षांचा दौरा आणि भारतीय पंतप्रधानांचा परदेश दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” निवडून भारतीय सुरक्षा दलांना वेगळे आव्हान दिले आहे.US Vice President in India, Indian Prime Minister in Saudi Arabia; Pahalgam terror attack is serious!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या आव्हानाचे गांभीर्य वेळीच ओळखले. त्यांनी सौदी अरेबियातूनच गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून प्रत्यक्ष घटनास्थळी जायला सांगितले, इतकेच नाही तर दहशतवाद्यांची नांगी ठेचण्याचा निर्धारही त्यांनी तिथून व्यक्त केला.
जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने तिथे विविध कल्याणकारी योजना राबवून राज्यातली परिस्थिती कमालीची सुधारली. राज्यात लोकशाही प्रक्रियेनुसार पंचायत निवडणुकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत सर्व निवडणुका यशस्वी करून दाखविल्या. प्रत्येक निवडणुकीतल्या मतदानाची टक्केवारी वाढती राहिली. जम्मू काश्मीर मधली जनता लोकशाही प्रक्रियेमध्ये सरमिसळून गेली. मात्र त्याचवेळी दहशतवादी आणि त्यांचे “आका” वरवर शांत बसलेले दिसत असले, तरी त्यांची कारस्थाने आतून सुरू होती, हेच आजच्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातून उघड झाले.
यापूर्वी दहशतवादी अमरनाथ यात्रा किंवा वैष्णोदेवी यात्रा सुरू होण्यापूर्वी पर्यटकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करायचे. त्यांची मोड्स ऑपरेंडी सुरक्षा दलांनी ओळखून उपाययोजना देखील केल्या होत्या. परंतु यावेळी मात्र अमेरिकेचे उपाध्यक्ष भारत दौऱ्यावर आलेले असतात आणि भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेले असताना दहशतवाद्यांनी “पॉलिटिकल टायमिंग” साधून पर्यटकांवर हल्ला केला. जम्मू कश्मीर मधून दहशतवाद संपलेला नाही. तिथले 370 कलम हटविले असले तरी आणि तिथे कितीही कल्याणकारी योजना राबविल्या असल्या तरी, आम्ही विषारी फणा वर काढल्याशिवाय राहणार नाही, हा धमकीवजा संदेश देण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केला.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काहीच दिवसांपूर्वी इस्लामाबाद मध्ये ओव्हरसीज पाकिस्तान्यांच्या मेळाव्यात भारताविरुद्ध गरळ ओकणारे भाषण केले होते. जम्मू काश्मीर पाकिस्तानचा अभिन्न भाग असल्याचा दावा करून त्यांनी जगातली कोणतीही ताकद जम्मू-काश्मीरला पाकिस्तान पासून अलग करू शकणार नाही, अशी दमबाजी केली होती. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे निमुटपणे पाकिस्तानी लष्कर प्रमुखाचे भाषण ऐकत स्वस्थ बसले होते. असीम मुनीर यांच्या भाषणाला शहाबाज शरीफ यांनी मुक संमती दिली होती. पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या भाषणातूनच दहशतवाद्यांना चिथावणी मिळाली आणि त्यांनी आज पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला केला.
– सर्जिकल स्ट्राइक कधी करणार??
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केले होते, त्यानंतर दहशतवाद्यांची नांगी ठेचली गेली होती. पाकिस्तान सुद्धा हबकला होता पण आता पाकिस्तान आणि दहशतवादी या दोघांनीही मनावर काढून पुन्हा सर्वसामान्य पर्यटकांना टार्गेट केले. मोदी सरकारला मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा मुकाबला मोदी सरकार कसे करणार हे पाहणे??, हे पाहणे येत्या काही दिवसांत महत्त्वाचे ठरणार आहे.
US Vice President in India, Indian Prime Minister in Saudi Arabia; Pahalgam terror attack is serious!!
महत्वाच्या बातम्या