Saudi Arabia : सौदी अरेबियामध्ये भारतीयही स्वतःचे घर खरेदी करू शकतील; तेल अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा मोठा निर्णय
सौदी अरेबियाने आपला रिअल इस्टेट क्षेत्र परदेशी लोकांसाठी खुला केला आहे. ‘सौदी प्रॉपर्टीज’ नावाच्या नवीन डिजिटल पोर्टलद्वारे आता परदेशी नागरिक, कंपन्या आणि गुंतवणूकदार तेथे मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.