• Download App
    केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलीसांकडून छळवणूक, सलग आठ तास चौकशी पोलिसांकडून चौकशी |Union Minister Narayan Rane harassed by police, interrogated by police for eight consecutive hours

    केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलीसांकडून छळवणूक, सलग आठ तास चौकशी पोलिसांकडून चौकशी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दिवंगत दिशा सालीयनबाबत वक्तव्य करीत शिवसेनेवर हल्लाबोल करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवणी पोलिसांनी शनिवारी आठ तास चौकशी केली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालीयनच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यावर राणेंवर दखलपात्र नोंदविण्यात आला आहे. पोलीस राणे यांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.Union Minister Narayan Rane harassed by police, interrogated by police for eight consecutive hours

    राणे हे शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांचे पुत्र नीतेश यांच्यासह शेकडो राणेसमर्थक उपस्थित होते.अ‍ॅड. सतीश मानेशिंदे तसेच अंगरक्षक आणि कमांडोदेखील होते. मालवणी पोलीस ठाण्याच्या तिसऱ्या मजल्यावर राणे आणि नीतेश यांना चौकशीसाठी नेण्यात आले.



    राणे यांचा जबाब घेण्यासाठी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर तसेच क्राइमचे पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी त्या ठिकाणी हजर होते. त्यानुसार तब्बल आठ तास चौकशी सुरू होती. राणे हे साडेचारच्या सुमारास बाहेर येतील, असे सांगण्यात आले; मात्र रात्रीचे नऊ वाजले तरीदेखील ते बाहेर न आल्याने समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते; तर पोलीस हे विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप मानेशिंदे यांनी केला.

    राणे यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालीयनवर बलात्कार करीत तिची हत्या करण्यात आली असे वक्तव्य केले. आमदार नीतेश राणे यांनी त्याला दुजोरा देत समाजमाध्यमांवर तिची प्रतिष्ठा व चारित्र्यहनन केले.

    यामुळे मुलीची बदनामी झाल्याचा आरोप आई वासंती सालीयन यांनी केला. त्यानुसार गुन्हा दाखल करीत मालवणी पोलिसानी गुरुवारी आणि शुक्रवारी हजर राहण्याचे समन्स बजावले. न्यायालयाने राणे यांना अटकेपासून १० मार्चपर्यंत दिलासा दिला आहे.

    Union Minister Narayan Rane harassed by police, interrogated by police for eight consecutive hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस