• Download App
    शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, मध्यप्रदेशात शिव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी Madhya Pradesh: Rumors that Nandi is drinking water in Shiva temple, crowd of devotees carrying milk

    शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, मध्यप्रदेशात शिव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

    वृत्तसंस्था

    इंदौर : मध्य प्रदेशच्या आलीराजपूर येथे शनिवारी दुपारी शिव मंदिरातील नंदी पाणी पित असल्याची अफवा गावभर पसरली. त्यानंतर, भाविकांनी दूध घेऊन मंदिरात धाव घेतली. विशेष म्हणजे या नंदी महादेवाला पाणी आणि दूध पाजण्यासाठी मंदिरात मोठी रांग लावली. नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी-दूध पाजण्यासाठी पुढे जात होते. Madhya Pradesh: Rumors that Nandi is drinking water in Shiva temple, crowd of devotees carrying milk

    शहरातील पंचेश्वर महादेव मंदिर, सर्वेश्वर महादेव मंदिर आणि शहरातील इतरही शिव मंदिरात भक्तानी पाणी व दूध घेऊन गर्दी केली आहे. नंदीच्या मुखाजवळ चमच्यात भरलेल पाणी हळूहळूकमी होत असून हा परमेश्वराचा चमत्कारच असल्याचं मत काही भाविकांनी व्यक्त केलं आहे.

    या अफवेनंतर खंडवा, इंदौर, मंदसौर, वास, खरगोन, शहडोलसह आजुबाजूच्या शहरात भाविकांनी शिव मंदिरात जाऊन नंदीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.

    Madhya Pradesh: Rumors that Nandi is drinking water in Shiva temple, crowd of devotees carrying milk

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर