• Download App
    Sharad Ponkshe अहिंसेच्याच्या नावाखाली काँग्रेसने हिंदूंना दुबळे आणि घाबरट बनविले; हिंदू संमेलनात शरद पोंक्षेंचे टीकास्त्र

    अहिंसेच्याच्या नावाखाली काँग्रेसने हिंदूंना दुबळे आणि घाबरट बनविले; हिंदू संमेलनात शरद पोंक्षेंचे टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : “स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते. जोपर्यंत हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांसाठी पूर्णपणे जागा होत नाही तोपर्यंत हिंदुंचे एकत्रीकरण आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ मराठी रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील परमहंस नगर येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात आबालवृद्धांसह परिसरातील नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.

    – आक्रमणामुळे हिंदू समाजात न्यूनगंड

    भारतावर सातत्याने आक्रमणे झाली. त्यामुळे हिंदू समाजाच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. ब्रिटिशांनी हिंदूंना आपल्या इतिहासापासून, संस्कृतीपासून, भाषेपासून तोडले. इंग्रजी आपल्यावर लादली. त्यामुळे हिंदूंना आपल्याच संस्कृतीची, धर्माची लाज वाटायला लागली. ब्रिटिशांनी हिंदूंपासून शस्त्र तोडलं. फक्त देवीदेवतांच्या हातात शस्त्र आहेत. पण हिंदुंच्या हातात शस्त्र नाहीत. त्यातच स्वातंत्र्यानंतर आलेल्या काँग्रेसने अहिंसेच्या नावाखाली हिंदुंना दुबळे, घाबरट बनविले. हिंदू समाजाचे सर्वाधिक नुकसान केले, असे पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.

    – 2024 च्या निवडणुकीत काठावर पास

    ते पुढे म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीत आपण काठावर पास झालो. अन्यथा आपली धडगत नव्हती. कुंभकर्णापेक्षाही हिंदू समाजाची झोप गाढ आहे. भारत हिंदूराष्ट्र होता, आहे आणि राहील असे म्हणून उपयोग नाही. प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदूराष्ट्र घोषित व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    भारतीय शिक्षणपद्धती आदर्श शिक्षणपद्धती होती, याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, भारतात सर्व वर्ण समान समजले गेले आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ किंवा शूद्र कनिष्ठ असे कधीच नव्हते. सर्वांशी प्रेमाने वागणे, माणुसकीने वागणे हा मानवधर्मच हिंदू धर्म आहे. संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणारा हिंदू धर्म आहे. मात्र ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक फोडा आणि झोडा या नीतिअंतर्गत जातीभेद निर्माण केले.

    – आर्थिक नाकेबंदी हे सर्वसामान्य हिंदूंचे शस्त्र

    एकेकाळी १०० टक्के हिंदू असलेले काश्मीर आज १०० टक्के मुस्लिम झाले आहे. हिंदुंनी जागरूक असणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळे, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, रिक्षा, टॅक्सीवाले असे सर्व हिंदूच असतील याची खात्री करून मगच आर्थिक व्यवहार करा. हलाल सर्टिफिकेट असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घाला. इस्लामी जिहादींची आर्थिक नाकेबंदी हे हिंदूंचे शस्त्र आहे, हे विसरू नका. शेजारच्या घरातील मुलगी लव जिहादमध्ये बळी पडली, पण आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे, म्हणून शांत बसू नका, असेही आवाहन यावेळी पोंक्षे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंदा पानसे भजनी मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला, तर सुकृती कथ्थक डान्स अकॅडमीतर्फे गणेश वंदना सादर करण्यात आली. सुनील ढोले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संघाच्या परमहंस नगराचे संघचालक हिरामण जगताप, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा बुटाला, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, दिनेश माथवड, जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. संदीप बुटाला, दिलीप चोरघे, नथाराम राठोड उपस्थित होते.

    Under the guise of non-violence, the Congress rendered Hindus weak and timid—Sharad Ponkshe launches a scathing attack at the Hindu Conference.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    35 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळायची अफवा; सरकारचा स्पष्ट शब्दांत खुलासा!!

    Dada Bhuse : RTE विद्यार्थ्यांकडून शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये ; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची स्पष्ट भूमिका

    प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??