• Download App
    पीपीई किट घालून का होईना पण उध्दव ठाकरेंनी बाहेर पडायला हवे होते, चंद्रकांत पाटील यांचा टोला Uddhav Thackeray should have come out even with PPE kit to solve peoples problem, says Chandrakant Patil

    पीपीई किट घालून का होईना पण उध्दव ठाकरेंनी बाहेर पडायला हवे होते, चंद्रकांत पाटील यांचा टोला

    Uddhav Thackeray should have come out even with PPE kit to solve peoples problem, says Chandrakant Patil

    डबल मास्क, पीपीई किट घालून का होईना पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक ते दीड वर्षांपूर्वीच बाहेर पडायला हवे होते. मराठा आरक्षण, कोरोनाचे संकट यावर उपाययोजना करायला हव्या होत्या, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. Uddhav Thackeray should have come out even with PPE kit to solve peoples problem, says Chandrakant Patil


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : डबल मास्क, पीपीई किट घालून का होईना पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक ते दीड वर्षांपूर्वीच मराठा आरक्षण, कोरोनाचे संकट यावर उपाययोजना करायला हव्य होत्या, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

    पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर पाटील म्हणाले, मुख्यमंत्री या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरंतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबतीत त्यांनी डबल मास्क, पीपीई किट घालून एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटी गाठी घेत आहेत ही त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणावी लागेल.



    महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. आगामी काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील असही पाटील यांनी सांगितले.

    शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वारकºयाला वापरलेल्या अपशब्दांवर टीका करताना पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हम करे सो कायदा, अरेरावी, भ्रष्टाचार हा स्थायीभाव आहे.अ ाता त्यांच्याबरोबर सत्तेत राहून शिवसेनेला त्यांचा हा गुण लागला आहे. एका शिवसेनेच्या आमदाराने माझ्या कार्यालयात चिठ्ठी घेऊन येऊन येणार्‍या नागरिकांनाच लस मिळेल अशाप्रकारचा फतवा काढला आहे. यावर काँग्रेसच्या आमदारानेच प्रत्युत्तर केले आहे.

    Uddhav Thackeray should have come out even with PPE kit to solve peoples problem, says Chandrakant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल