• Download App
    महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावत शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितली 15 लाखांची खंडणी, दोन पत्रकारांना अटक|Two journalists arrested for demanding Rs 15 lakh ransom from Shiv Sena corporator

    महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावत शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितली 15 लाखांची खंडणी, दोन पत्रकारांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावून शिवसेनेच्या नागरसेवकाकडे बदनाम करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी माजी उपसरपंच, पत्रकारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पत्रकारासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.Two journalists arrested for demanding Rs 15 lakh ransom from Shiv Sena corporator

    हा प्रकार 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत सावतामाळी चौकातील नगरसेवकाच्या कार्यालयात घडला.माजी उपसरपंच प्रितम शंकरसिंग परदेशी, संगिता वानखेडे, कांतीलाल सावता शिंदे, गितांजली भस्में, कल्पेश अनंतराव भोई (वय-49), मंदा जोगदंड, कुणाल राऊत (सर्व रा. चाकण), संगिता नाईकरे (रा. तनिष सोसायटी फ्लॅट नं, सी 901 दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    याप्रकरणी 41 वर्षीय नगरसेवकाने फिर्याद दिली आहे. पत्रकार कल्पेश अनंतराव भोई आणि कुणाल राऊत यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. फिर्यादी हे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी एका महिलेला चाकण पोलीस ठाण्यात वारंवार पाठवले.

    या नगरसेवका विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल करुन सुरुवातीला 15 लाखांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर तडजोड करुन 12 लाख किंवा 5 लाख रुपये व तक्रारदार महिलेच्या उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली.

    पैशाची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक यांच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. तसेच पैशांची मागणीचे व्हॉट्सअॅप चॅटिंग देखील समोर आले आहे.

    Two journalists arrested for demanding Rs 15 lakh ransom from Shiv Sena corporator

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!