• Download App
    महाराष्ट्रातील ६ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या Transfers of 6 Senior IAS Officers in Maharashtra

    महाराष्ट्रातील ६ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश पाटील आणि अजय गुल्हाने यांच्यासह आणखी 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 2023 मध्ये सुरवातीलाच महापालिका निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. Transfers of 6 Senior IAS Officers in Maharashtra

    राजेश पाटील : संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    अश्विन ए. मुद्गल : सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई अतिरिक्त म्हणून पोस्ट केले आहे. महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई.

    अजय अण्णासाहेब गुल्हाने : नागपूर स्मार्ट सिटी, सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचा अतिरिक्त कार्यभार

    दीपक सिंगला : अतिरिक्त आयुक्त, PMRDA पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    भाग्यश्री बानायत : नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    डॉ. इंदुरानी जाखर : MAVIM च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    Transfers of 6 Senior IAS Officers in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!

    मारामारीबद्दल खेद व्यक्त करतानाही जितेंद्र आव्हाडांची नसती मखलाशी, जयंत पाटलांची मध्यस्थी; पण मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्यावर वरकडी!!

    रोहित पवारांची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी; 353 चा गुन्हा दाखल करायची मागणी