• Download App
    मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊकच नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला|Today's rulers do not know that Maharashtra is beyond Mumbai; Fadnavis tola Thackeray

    मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊकच नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

    प्रतिनिधी

    नाशिक : मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना माहितीच नाही. जे काही करायचे ते मुंबईत करायचं असं त्यांना वाटतंय. पण त्या पलिकडे मोठा महाराष्ट्र आहे आणि मुंबईत तरी किती भयानक अवस्था आहे हे मी मुंबईत जाऊन सांगणार आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशकात लगावला.Today’s rulers do not know that Maharashtra is beyond Mumbai; Fadnavis tola Thackeray

    त्याचवेळी त्यांनी निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्याचा संदर्भ दिला आणि कोणीही किती एकत्र येऊ द्यात. निवडणुक अर्थमॅटिकवर नव्हे, तर पॉलिटिकल केमिस्ट्रीवर जिंकल्या जातात. जनता महाविकास आघाडी बरोबर नाही, तर भाजप बरोबर आहे हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.



     

    नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुल अहेर, राहुल ढिकले उपस्थित होते.

     देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    शिवछत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आहे. काही तो केवळ मिरवत आहेत. या भगव्याचे रक्षण करायचे आणि तो सतत फडकत राहिला पाहिजे, ही जबाबदारी आता भाजपाने कार्यकर्त्यांच्या बळावर घेतली आहे.

    महानगरपालिका दत्तक घ्यायची म्हणजे तेथे रोज बसून दलाली खायची असे नाही. काही लोकांनी तसा ग्रह करून घेतला. दत्तकचा अर्थ केंद्र आणि राज्याच्या योजना तेथील महापालिकेमार्फत राबवून घ्यायच्या आणि शहराचा विकास करायचा.

    मेट्रो सुरू करायची, ही तमाम नाशिककरांची इच्छा होती. काही अडचणी आल्या, तेव्हा जगभरातील मेट्रोंचा अभ्यास करून निओ मेट्रोचा पहिला प्रकल्प नाशिककरांसाठी दिला. आज तो पथदर्शी ठरला आणि इतक्या लोकसंख्येच्या शहरांसाठी देशभरात निओ मेट्रो स्वीकारली जाऊ लागली आहे.

    निर्मल नाशिक हे आमचे पुढचे ध्येय आहे.वाहतूक, नद्या, गोदावरी, पर्यावरण हे सारे प्रदूषणमुक्त असले पाहिजे. नमामि गंगेच्या धर्तीवर यासाठीच्या प्रकल्पाला सुद्धा केंद्र सरकार लवकरच मंजुरी देईल, अशी आम्हाला खात्री आहे.

    भाजपला राज्य हवे असते ते दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी. आता नाशिकला आयटी हब करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    कोरोनाच्या काळात नाशिकवर मोठा अन्याय झाला. मुंबई, पुण्यात कोविड सेंटर निघाले. पण, नाशिकला नाही. महापालिकेने त्वरेने हॉस्पीटल उभारले, राज्य सरकारने एक पैसा दिला नाही.

    महाराष्ट्रात राज्यकर्ते कोण हेच समजत नाही.
    मुंबईच्या पलिकडे महाराष्ट्र अस्तित्वात आहे, हेच त्यांना ठावूक नाही. मुंबईत सुद्धा काय अवस्था आहे, हे मी मुंबईत सांगतोच, त्याचा पुनरुच्चार येथे करण्याची गरज नाही.- कोणी कितीही एकत्र येऊ द्या, जनता भाजपासोबत आहे. निवडणुका ‘अर्थमॅटिक’ने नाही, तर ‘पॉलिटिकल केमेस्ट्री’ने जिंकल्या जातात, हे लक्षात घ्यायला हवे.

    Today’s rulers do not know that Maharashtra is beyond Mumbai; Fadnavis tola Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस