नाशिक : भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तोंड कडूच राहिल्याचे 26 फेब्रुवारीच्या पक्षाच्या बैठकीतून समोर आले.Thirst of power; Clash in NCP emarge more fierceful
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस बरोबर सत्ता भोगताना सुद्धा ती नीट न भोगता काँग्रेसच्या नेत्यांवर दुगाण्या झाडल्या होत्या. पण आता भाजपच्या नेत्यांवर थेट दुगाण्या झाडायची हिंमत नाही म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाच्या बैठकीत वेगवेगळ्या राजकीय उखाळ्या पाखाळ्या काढल्या. या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे आजी-माजी आमदार हजर होते. राष्ट्रवादीच्या बैठकीत संदर्भातली बातमी वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिली. त्यातूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उखाळ्या पाखाळ्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आल्या.
– सुनील तटकरे संतप्त, पार्थचा काढता पाय
राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबातल्या नेत्यांनाच वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागली, पण ती धडपड सुद्धा धड करता आली नाही. त्याचे पडसाद मुंबईत देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटले. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर ठळक प्रश्नचिन्ह लावले. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच टीकेचे धनी का झाले??, त्यांच्या मदतीला कोणी का आले नाही??, असे सवाल सुनील तटकरे यांनी विचारले. त्यावरून छगन भुजबळ यांच्याशी त्यांची खडाजंगी झाल्याचे बोलले गेले. झाले गेले, ते सोडून द्या. आपण पुढे जाऊ, असे भुजबळ म्हणाले. पण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह सुनील तटकरे यांनी धरला. सुनील तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवारांनी काढता पाय घेतला होता. या घटनेचे बरेच राजकीय अर्थ काढले गेले.
– प्रफुल्ल पटेल गैरहजर
देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत बरेच राजकीय मंथन होणार हे लक्षात येताच प्रफुल्ल पटेल त्या बैठकीलाच गैरहजर राहिले. प्रफुल्ल पटेल मुंबईत असून सुद्धा बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेचे सुद्धा वेगवेगळे अर्थ बाहेर आले.
– सुनेत्रा पवारांची म्हणे भाजप वर टीका
मात्र या बैठकीत सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांनी वेगवेगळे सूर लावल्याचे सुद्धा सांगितले गेले. सुनेत्रा पवारांनी म्हणे थेट भाजपच्या नेत्यांविषयीच तक्रार केली. अजित पवारांकडे अर्थ खाते होते त्यांच्या अकाली एक्झिट नंतर ते अर्थ खाते भाजपने स्वतःकडे घेतले पण त्यानंतर वारंवार मागणी करून सुद्धा अजून भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीकडे अर्थ खाते दिले नाही, अशी तक्रार म्हणे सुनेत्रा पवारांनी केली. पण राष्ट्रवादीकडे अर्थ खाते सांभाळायला इतर कोण नेते सक्षम आहेत की नाही?? पवारांच्या घरातल्या नेत्यांना सोडून म्हणजेच स्वतःला सोडून इतरांकडे अर्थ खाते सोपविले तर चालणार आहे का??, या सवालांचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. त्यांनी म्हणे फक्त भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करून घेतली.
– SIR मुद्द्यावर भुजबळांचे तोंड कडू
छगन भुजबळ यांनी SIR अर्थात मतदार याद्यांच्या परीक्षणाच्या मुद्दा पुढे आणला. मूळात एकाच पक्षाला फायदा करून देण्यासाठी SIR चा उद्योग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या पक्षाला मिळणारी पारंपरिक मध्ये कापण्यात सत्ताधारी भाजपला रस असल्याचा दावा त्यांनी केला. एकूणच छगन भुजबळ यांनी भाजपच्या सत्तेची फळे चाखतानाही तोंड कडू केले. २०२९ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजप आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेणार आहे की माहिती नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 288 जागा लढवायची तयारी करावी विधानसभेच्या जागा वाढणार असतील तर वाढीव जागांवर लढण्याची सुद्धा तयारी करावी, अशी सूचना भुजबळ यांनी केली. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून भाजपच्या सत्तेची फळे चाखून भुजबळांनी त्या फळांच्या बिया भाजपच्या दिशेने फेकल्या.
– पण सत्ता सोडायची हिंमत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरी वरच्या बैठकीतून त्या पक्षाला धडपणे सत्तेची फळे चाखता येत नाहीत. प्रमाणापेक्षा सत्ता भोगण्याची खुमखुमी जात नाही आणि मित्र पक्षांवरच दुगाण्या झाडायची सवय संपत नाही, हेच राजकीय वास्तव सिद्ध झाले. पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्ता सोडायची हिंमत नाही, हे सुद्धा राजकीय वास्तव अधिक सिद्ध झाले!!
Thirst of power; Clash in NCP emarge more fierceful
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने NTA ला विचारले-मागील चुकीतून काय शिकला? तुम्ही कोणताही धडा घेतला नाही, हे दुःखद
- इंधनाची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती : ST ची डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम; दररोज १००० लिटर डिझेलची बचत!!
- बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पण पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!
- एस.जयशंकर यांच्या व्हिडिओतील वक्तव्यात फेरफार केल्याचे उघड !