• Download App
    पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या आवारातील सहा चंदनाच्या झाडांची चोरी; सुरक्षेने वेढलेल्या भागातच चोरीचा प्रकार|Theft of six sandalwood trees In the premises of Bombay Engineers Group, Pune ; theft in areas surrounded by security

    पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या आवारातील सहा चंदनाच्या झाडांची चोरी; सुरक्षेने वेढलेल्या भागातच चोरीचा प्रकार

    वृत्तसंस्था

    पुणे : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (BEG) आणि भारतीय लष्कराच्या केंद्राच्या परिसरातून सहा चंदनाची झाडे तोडून चोरण्यात आली आहेत. कडेकोट सुरक्षेत असलेल्या आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील भागात ही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.Theft of six sandalwood trees In the premises of Bombay Engineers Group, Pune ; theft in areas surrounded by security

    लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर येरवडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.तक्रारीनुसार गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. सहाय्यक निरीक्षक प्रमोद खटके म्हणाले, ‘प्राथमिक तपासात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याचे समजते. आम्ही तपास सुरू केला आहे.’



    बॉम्बे इंजिनीअर ग्रुप, ज्याला बॉम्बे सॅपर्स म्हणूनही ओळखले जाते. ही कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सची एक रेजिमेंट असून लष्कराच्या सर्वात जुन्या अभियांत्रिकी फॉर्मेशन्सपैकी एक आहे.

    बीईजी आणि केंद्र हा एक सुरक्षित परिसर आणि शहरातील संवेदनशील ठिकाणांपैकी एक आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.पुण्यातील सुरक्षित परिसरातून चंदनाची झाडे गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशाच चोरीच्या घटनांत संघटित टोळ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    पुणे कॅम्पमधील गॅरिसन इंजिनीअर (उत्तर), राज्य राखीव पोलिस दल, आर्म फोर्सस मेडिकल स्टोअर्स डेपो, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, खडकी शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना येथूनही चंदनाची पूर्ण वाढलेल्या झाडांची चोरी झाली होती.

    Theft of six sandalwood trees In the premises of Bombay Engineers Group, Pune ; theft in areas surrounded by security

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    विरोधी पक्षनेते पदांवरची नावे बदलून भाजपची महाविकास आघाडीत पाचर!!

    Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंचे 13 आमदार माझ्या संपर्कात:मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा; आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सूतोवाच

    Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- वेगळ्या विदर्भाचा आमचा अजेंडा कायम; आम्ही त्यावर काम करत आहोत