‘त्या’ व्हायरल व्हिडीओचे सत्य सांगणारा व्हिडीओ, भाजपाने आणला समोर
विशेष प्रतिनिधी
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका नागरिकाचा हात ओढला, असा आरोप करीत विरोधकांनी सोशल मीडियावर एक विपर्यस्त व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओत दिसत असलेल्या व्यक्तीचा देवेंद्र फडणवीस यांनी हात ओढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पण यामागील वस्तूस्थिती आणि सत्य आता अखेर उघड झाले आहे. The truth of that video of Fadnavis in Nagpur finally came out
याबाबत भाजपाने संबंधित व्यक्तीचा व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे की, ”त्या संबंधित व्यक्तीने स्वत:हून समोर येत या विषयातील वस्तूस्थिती आज जनतेसमोर कथन केली. या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटंले आहे की, ‘‘ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या भागात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी नागरिकांशी ते चर्चा करीत असताना गर्दीमुळे सुरक्षारक्षक आणि पोलिस मला फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू देत नव्हते. ही गोष्ट फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी माझा हात धरला आणि चल बाबा मी तुझ्या घरी येतो असे म्हणत मला ते माझ्या घरी पाहणी करायला घेऊन गेले.”
‘‘ आता स्वतः या नागरिकानेच वस्तूस्थिती समोर आणल्याने कालपासून कोल्हेकुई करणारे विरोधक आणि त्यांची भाडोत्री ट्रोलर्स मंडळी तोंडावर आपटली आहे. ‘ सत्य अस्वस्थ होईल पण पराभूत होत नाही‘ या उक्तीचे यानिमित्ताने प्रत्यंतर आले आहे. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे, या देवमाणसावर केलेले खोटे जास्त काळ टिकत नाहीत, त्यांचे विरोधक तोंडघशी पडतात हा अनुभव देखील यानिमित्ताने आला असेल. असंही भाजपाने म्हटले आहे.
The truth of that video of Fadnavis in Nagpur finally came out
महत्वाच्या बातम्या
- सई ताम्हणकरच्या ११ व्या घरासाठी प्रिया बापटची खास पोस्ट!
- MP Election 2023 : भाजपाने ३९ उमेदवारांची यादी केली जाहीर, सहा महिलांना दिले निवडणुकीचे तिकीट
- नेदरलॅंडमधील आइंडहोव्हन शहरात ढोल-ताशांच्या गजरात निघाली गणरायाची जंगी मिरवणूक
- व्हॉट्सअॅप चॅनलवरही पंतप्रधान मोदींचा दबदबा, एका आठवड्यात सब्सक्राइबर संख्या ५० लाखांच्या पुढे