• Download App
    दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा!!; मुंबई महापालिकेत भांडण शिवसेना-भाजपचे; तोट्यात काँग्रेस!! । The quarrel between the two, the loss of the third !!; Shiv Sena-BJP quarrel in Mumbai Municipal Corporation; Congress at a loss !!

    दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा!!; मुंबई महापालिकेत भांडण शिवसेना-भाजपचे; तोट्यात काँग्रेस!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : “दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ” ही सर्वसाधारण मराठी म्हण आहे. ती सर्वसामान्य जीवनात अनुभवायला येत असली तरी राजकारणात मात्र ही म्हण तंतोतंत लागू पडेलच याची शाश्वती नाही. किंबहुना काँग्रेसच्या बाबतीत “दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा” अशी म्हण लागू होताना दिसते आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांच्या भांडणात निदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरी आत्तापर्यंत काँग्रेसचा लाभ होण्याऐवजी तोटा होताना दिसला आहे. महापालिकेतील नगरसेवकांची आकडेवारी यासंदर्भात बरेच काही बोलून जात आहे. The quarrel between the two, the loss of the third !!; Shiv Sena-BJP quarrel in Mumbai Municipal Corporation; Congress at a loss !!

    महाविकास आघाडीमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी मोठी दरी निर्माण झाली आहे ती पुन्हा मिटून येण्याची शक्यता कमीच आहे. मात्र असे असले तरी शिवसेना आणि भाजप हे पुन्हा एकत्र यावेत आणि युती म्हणून त्यांनी निवडणूक लढवावी हे आता काँग्रेस पक्षालाच वाटू लागले आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याने काँग्रेसच्या जागांची संख्या कमी होते, अशी भीती आता काँग्रेसला वाटू लागली आहे आणि याचमुळे काँग्रेसचे नेते अंतर्मनातून शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

    मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २२७ जागा लढवल्या होत्या आणि या जागांपैकी काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एका नगरसेवकाच्या मृत्यू झाला, त्याठिकाणी भाजपच्या जागृती पाटील निवडून आल्या. विठ्ठल लोकरे यांनी पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश करत निवडून आले. तर नगरसेवक राजपती यादव व स्टेफी केणी यांचे पालिका सदस्यत्व रद्द झाले आणि दिन ठिकाणी शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रफिक शेख तसेच नितीन सलागरे हे दोन नगरसेवक वाढले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान सदस्य संख्या ही २९ एवढी झाली आहे.

    मुंबई महापालिकेच्या आजवरच्या पाच निवडणुकीच्या तुलनेत २०१७ च्या निवडणुकीतील काँग्रेसचे ही निचांकी संख्या आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढल्यामुळेच काँग्रेसचे कमी नगरसेवक निवडून आले आहे. भविष्यातही शिवसेना आणि भाजपची युती नसल्यास त्याचा फटका आपल्याला बसू शकतो याचीही खात्री काँग्रेसला वाटू लागली आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना शिवसेना-भाजप यांची युती हवी आहे.



    याबाबत १९८५ मधील निवडणुकीचा आढावा घेतला काँग्रेस ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर १९९२ मध्ये काँग्रेसने आज वरच्या सर्व निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ११२ जागा मिळाल्या होत्या, तेवढ्या आजपर्यंत सत्ताधारी शिवसेनेलाही मिळवता आलेल्या नव्हत्या.

    त्यानंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली ती आजतागायत कायमच आहे. १९९७ मध्ये काँग्रेसचे ४९, २००२ मध्ये ६१ नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पारड्यात थोडी जास्त मते पडली आणि २००७ मध्ये काँग्रेसचे ७६ नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये ही संख्या कमी होऊन ५२ वर आली आणि २०१७ मध्ये काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले. १९९२ च्या निवडणुकी नंतर महापालिकेत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढून एकत्र आले होते आणि त्यानंतर १९९७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती झाली होती आणि या युतीत शिवसेना-भाजपचे १२९ नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे निवडून आले होते .

    परंतु हा इतिहास असला तरी शिवसेना भाजप मधील युतीच्या उमेदवारा विरुद्ध असलेली नाराजी ही कायम काँग्रेसच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांना असे वाटतेय की, शिवसेना भाजप यांची युती झाल्यास काँग्रेसची जी संख्या आता कमी आली आहे, ती किमान 50-60 च्या पुढे जाऊ शकते. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार जरी आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी महापालिकेतील पक्षाचे आणि विरोधी पक्ष होत राखण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना-भाजप यांची युती होणेही तेवढेच महत्त्वाचा आहे. भविष्यामध्ये ही युती न झाल्यास काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पदही जाऊ जाऊ शकते, अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती होणे हे काँग्रेसची नगरसेवकांची संख्या वाढ आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद कायम राखण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.

    या सगळ्या प्रकारात महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या खिजगणतीतही नाहीये. शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढणार असले तरी ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरते राजकीयदृष्ट्या गृहीतही धरत नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची इथे संघटनात्मक ताकदच नाही.

    सात सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेस नगरसेवकांची संख्या

    • १९८५ : ३७ नगरसेवक
    • १९९२ : ११२ नगरसेवक
    • १९९७ : ४९ नगरसेवक
    • २००२ : ६१ नगरसेवक
    • २००७ : ७६ नगरसेवक
    • २०१२ : ५२ नगरसेवक
    • २०१७ : ३१ नगरसेवक

    The quarrel between the two, the loss of the third !!; Shiv Sena-BJP quarrel in Mumbai Municipal Corporation; Congress at a loss !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस