विशेष प्रतिनिधी
नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या गाजत आहेत. राजकीय पक्षांमध्ये घमासान होत आहे. या निवडणुकांचा आणि राजकीय पक्षांच्या चिन्हांचा इतिहासही असाच रंजक आहे. The palm of the hand is the election symbol of the Congress today; But whose was it before?
आज हाताचा पंजा हे कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे. पण हे काही पहिल्यांदाच काँग्रेसला मिळालेल्या चिन्ह नाही. याआधीही हाताचा पंजा हे चिन्ह अस्तित्वात होतेच. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हाताचा पंजा चिन्ह हे एका राष्ट्रीय पक्षाला मिळाले होते. हे वाचून आश्चर्य वाटेल आणि या राष्ट्रीय पक्षाचा मराठी माणसाची संबंध होता.
हाताचा पंजा हे चिन्ह 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉक रुईकर गटाचे चिन्ह होते, तर गर्जना करणारा असे म्हणून सिंह हे फॉरवर्ड ब्लॉगच्या मार्क्सवादी गटाचे चिन्ह होते. रामचंद्र सखाराम तथा आर. एस. रुईकर हे मोठे कामगार नेते होते. भारतात डाव्या कामगार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नेत्यांपैकी रुईकरांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या फुटीचे नेतृत्व केले. त्यांच्या गटाला हाताचा पंजा हे चिन्ह मिळाले होते. हा पक्ष नंतर अस्तित्वहीन झाला आणि त्यामुळे हाताचा पंजा हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवून ठेवले.
1980 च्या दशकात युवा काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा काँग्रेस अस्तित्वात आली. त्यावेळी निवडणूक चिन्ह निवडण्याचा इंदिरा गांधी यांना पर्याय देण्यात आला. त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह आपल्या काँग्रेससाठी निवडले. आज हेच चिन्ह काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून अस्तित्वात आहे.
The palm of the hand is the election symbol of the Congress today; But whose was it before?
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Updates : गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, ८७१ जणांचा मृत्यू
- Budget Session : 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहांत शून्य तास राहणार नाही, अर्थसंकल्पामुळे घेतला निर्णय
- मोठी बातमी : महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीकडे कबुली, अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंग करायला सांगायचे!