नाशिक : नाशिक मधून समोर आलेल्या TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.TCS corporate Jihad: Secularism exploded as soon as Nida Khan was arrested; Owaisi and Congress came forward to save her!!
नाशिक मधल्या टीसीएस कंपनीत धर्मांतराचे रॅकेट चालवणारी निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली त्यांची कसून चौकशी आणि तपास केला. त्यातून धर्मांतराच्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे मलेशियापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले.
– निदा खानला लपविण्यात AIMIM चा हात
पण याच दरम्यान निदा खान मात्र फरार झाली होती. तिला असदुद्दीन ओवेसी यांच्या ए आय एम आय एम पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल याने छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या फ्लॅटवर लपवून ठेवले होते. तिच्याबरोबर तिच्या आई-वडिलांना आणि अन्य नातेवाईकांना देखील फ्लॅटवर ठेवले होते. ए आय एम आय एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिचे समर्थन केले होते. पण पोलिसांनी तिच्या भेटीचा कायदेशीर कारवाईचा फास आवळला. नाशिक कोर्टाने सुद्धा तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. तिच्या चौकशी आणि तपासातून धर्मांतराचे मोठे रॅकेट उघडकीस आले. त्याचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचले.
– ओवैसीं कडून बचाव
त्यानंतर मात्र असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसच्या नेत्यांना धर्मनिरपेक्षतेचे धुमारे फुटले. ओवैसी आणि काँग्रेसचे नेते निदा खानच्या समर्थनासाठी बाहेर आले. निदा खान ही काही देशद्रोही किंवा दहशतवादी नाही. तिचा गुन्हा सुद्धा सिद्ध झालेला नाही त्यामुळे तिच्या संदर्भात वाटेल त्या खबरी पसरविण्याचे गरज नाही, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. निदा खान दोषी आहे की नाही हे न्यायालय ठरवेल भाजपने किंवा त्यांच्या समर्थकांनी तिच्यावर दोषाचा ठपका ठेवू नये, असे वक्तव्य ओवैसी यांनी केले. तिला कोर्टाने शिक्षा दिलेली नाही त्यामुळे उगाच तिची मीडिया ट्रायल करू नका, असाही सल्ला ओवैसी यांनी दिला.
– निदा खानचा काँग्रेस कडून बचाव
त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा निदा खान हिचे समर्थन केले. कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणाच्या निमित्ताने भाजपला महाराष्ट्रात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करून दंगली पेटवायच्यात, असा आरोप सपकाळ यांनी केला. मनुवादी विचारांमधून संघ आणि भाजपला देशात द्वेष पसरवायचा आहे, असे ते म्हणाले.
– कोर्टातला युक्तिवाद
निदा खान हिच्या वकिलांनी नाशिक कोर्टामध्ये तिच्या गरोदर असण्याचा मुद्दा प्रामुख्याने लावून धरला. ती गरोदर असल्यामुळे तिला न्यायालयीन कोठेही ठेवण्याची मागणी केली. पण तिच्या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन न्यायालयाने तिला पोलीस कोठडी ठेवण्याचेच आदेश दिले.
– जिहाद विषयावर सुप्रिया सुळे, रोहित पवार गप्प
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी टीसीएस कॉर्पोरेट जिहाद संदर्भात एकही शब्द काढला नाही. एरवी केंद्र सरकार पासून राज्य सरकारपर्यंत आणि कुठल्याही ग्रामपंचायती पर्यंत असेल त्या विषयांवर सल्ला देणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी विकास लवांडेंवर झालेल्या शाईफेकीचा निषेध केला, पण नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद संदर्भात एकही ट्विट केले नाही किंवा कुठली सोशल मीडिया पोस्ट लिहिली नाही.
TCS corporate Jihad: Secularism exploded as soon as Nida Khan was arrested; Owaisi and Congress came forward to save her!!
महत्वाच्या बातम्या
- Drone Force : भारत- पहिल्यांदाच 50 हजार जवानांची स्वतंत्र ड्रोन फोर्स; बीएसएफ व आयटीबीपीमध्येही असेल, सर्वात आधी हेच हल्ला करतील
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी; जुन्या ममता शिष्यावरच ममतांच्या राजवटीतले गदळ दूर करायची जबाबदारी!!
- Indian Railways : वेटिंग तिकीट निश्चित होईल की नाही, AI सांगणार; रेल्वे 40 वर्षांपूर्वीच्या आरक्षण प्रणालीत बदल करणार
- Odisha : ओडिशा येथे जीआरपी कॉन्स्टेबलची मारहाण करून हत्या; छेडछाडीच्या आरोपावरून गर्दीने मारले