वृत्तसंस्था
कोल्हापूर : स्वाभिमानाचे वीज मागणीचे आंदोलनाला हिंसक वळण लागले असून शेतकऱ्यांनी मध्यरात्री महावितरणचे कार्यालय पेटवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा हा परिणाम मानला जात आहे.तसेच आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. Swabhimana’s power demand agitation ignited; Farmers set fire to MSEDCL office
शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडली.
मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले. प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये काही कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा संघटनेकडून इशारा,” अशं ट्विटही संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करत देण्यात आला.
Swabhimana’s power demand agitation ignited; Farmers set fire to MSEDCL office
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik ED : नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांचे आंदोलन; तर विरोधात भाजपची निदर्शने
- पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे मेट्रोतून प्रवास ६ मार्च; शिवाजी महाराज पुतळा स्मारकाचे लोकार्पण सुध्दा
- दिल्लीत चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण दिवस किमान तापमान १५ अंश
- ७६२ कोटी रुपयांची बोगसगिरी करणारा अटकेत नीलेश पटेल; गुजरातच्या जीएसटी विभागाची कारवाई