विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashok Kharat स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत खरातकडून तब्बल १३.९२ कोटी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि लक्झरी मर्सिडीज अमेरिकन डॉलर असा कोटयावधीचे घबाड जप्त केले आहे.Ashok Kharat
तपासाची व्याप्ती वाढवत शिर्डी, राहता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही यात जोडण्यात आले. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा मुख्य गुन्हा सिद्ध होत असल्याने ईडीने यात उडी घेतली. १३ एप्रिल ते १८ मे २०२६ दरम्यान ईडीने आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या निवासस्थानांवर, व्यावसायिक ठिकाणांवर आणि बँक लॉकर्सवर मोठे छापे टाकले. ईडीच्या छापेमारीत घबाड हस्तगत करण्यात आले आहे.Ashok Kharat
अमेरिकेत खरातने घेतले वैद्यकीय उपचार
खरात स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगायचा. लोकांमध्ये काळी जादू आणि मृत्यूची भीती निर्माण करून, त्यांच्याकडून ‘अवतार पूजा’, धार्मिक उपचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळत होता. खरातने केवळ एका तक्रारदाराकडून तब्बल ५.६२ कोटी रुपये उकळले होते. या पैशातून त्याने लक्झरी मर्सिडीज कार खरेदी केली, परदेश वाऱ्या केल्या, अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेतले आणि आलिशान फार्महाऊस विकसित केल्याचे तपासात समोर आले आहे.
Supreme Court Strict Directives on Solid Waste Management Rules 2026
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी; रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!
- महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- महाराष्ट्र शासन आणि ॲग्रेको इंडिया कंपनीचा सामंजस्य करार; ४०० कोटींची गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती!!
- Supreme Court : कचरा नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई; दंडापासून खटल्यांपर्यंतची तरतूद, सर्वोच्च न्यायालयाचे