• Download App
    Sunetra and Parth Pawar भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!

    नाशिक : भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

    भाजप आणि शिवसेना यांनी आपापसांतला तिढा सोडवून अकरा आणि चार उमेदवार जाहीर केले. त्यांच्या अर्जाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची पुण्यातल्या जागेचा तिढा सोडविण्यात पुरती दमछाक झाली. राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची नाराजी सहन करावी लागली. विक्रम काकडे यांच्या गळ्यात उमेदवारी घालताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची पुण्यात वाताहात झाली.

    – पवारांच्या शब्दांमध्ये वजन घटले

    सुनेत्रा पवारांनी काल रात्री दीड वाजेपर्यंत बैठका घेतल्या त्यामध्ये त्यांनी विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित केली. पण ती उमेदवारी त्या जाहीर करू शकले नव्हत्या. कारण पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व निष्ठावंत नेत्यांचा विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध होता. पार्थ पवारांनी मात्र त्यांचे नाव रेटून धरले होते. पण तरीसुद्धा काल रात्री विक्रम काकडे यांचे नाव जाहीर झाले नाही.

    सुनेत्रा पवारांनी आज सकाळपासून पुन्हा जिजाई बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू केला. त्यामध्ये त्यांनी दिलीप वळसे पाटलांनाही सामील करून घेतले. त्यांना आणि दिलीप वळसे पाटलांना पुण्यातल्या स्थानिक नेत्यांची समजूत काढताना नाकी नऊ आले. जिजाई बंगल्यावर तब्बल चार तास बैठक झाली. त्यामध्ये संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करवून घेण्यात आला. त्यानंतरच विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर करावी लागली.



    – राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

    पण याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसला. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा निर्णय धुडकावून लावत पुण्यातल्या पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी पदाचा राजीनामा सुनील टिंगरे यांच्याकडे दिला. पुण्यातले आणि पिंपरी चिंचवड मधले सगळेच ज्येष्ठ नेते नाराज झाले. यामध्ये विलास लांडे, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा सुद्धा समावेश होता. या सगळ्यांची समजूत काढताना सुनेत्रा पवारांची दमछाक झाली.

    – देवेंद्र फडणवीस यांनी घुसविलेला उमेदवार

    विक्रम काकडे यांना उमेदवारी देताना पार्थ पवार यांनी आपला हट्ट पुरवून घेतला, पण पुण्यातल्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी झाल्याने विक्रम काकडे यांच्यासाठी सुद्धा सहज असणारी निवडणूक अचानक “जड” बनली, इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे आणि विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायची परवानगी देऊन भाजपचाच उमेदवार राष्ट्रवादी मध्ये घुसविल्याची चर्चा सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना सहन करावी लागली. पण विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याशिवाय या दोन्ही नेत्यांपुढे पर्याय शिल्लक राहिला नाही. कारण सुनेत्रा पवारांनी पुण्यातील जागा भाजपाकडून आग्रहपूर्वक मागून राष्ट्रवादीकडे घेतली, पण मूळच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे समाधान करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांच्या ऐवजी भाजपमधून आलेल्या संजय काकडे यांच्या मुलाला त्यांना उमेदवारी देणे भाग पडले. संजय काकडे हे जरी व्यावसायिक असले आणि ते अजित पवारांच्या जवळचे असले, तरी नव्या सत्ता समीकरणात ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याच आदेशानुसार ते पुन्हा राष्ट्रवादीत आले आणि त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून दिली.

    Sunetra and Parth Pawar face an uphill battle while fielding Vikram Kakade—an infiltrator planted by the BJP within the NCP—as a candidate

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Wadettiwar : जरांगेंचे उपोषण संपल्यानंतर राजकारण तापले; ‘डबल ढोलकी सरकार’ म्हणत वडेट्टीवारांचा हल्लाबोल, हाकेंकडूनही तीव्र टीका

    भाजप – शिवसेनेचे मिळून १५ उमेदवार झटकन जाहीर; पण राष्ट्रवादीची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक!!

    Vikas Lawande : ‘सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?’; विकास लवांडेंचा गंभीर आरोप, कुटुंबालाही धोका असल्याचा दावा