काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. Story behind samna Editorial: Mamata’s intentions to form a third front are deadly; Mamata’s politics is not Congress-oriented; Shiv Sena’s attack on Mamata
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ममता बॅनर्जी नुकत्याच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.कॉंग्रेसच्या बर्याच नेत्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .तर तृणमूलचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत.असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.
काय आहे सामनात ?
भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. तृणमूलकडून काँग्रेसवर झालेल्या टीकेनंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून ममता बॅनर्जींवर टीकेचे बाण सोडत कॉंग्रेसची बाजू घेतली आहे.
ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे.”
“काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.
काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे, याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख-चैन-सत्ता प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत.
आझाद वगैरे मंडळींनी ‘जी 23’ नामक असंतुष्टांचा गट स्थापन केला आहे व त्या गटातील जवळ जवळ प्रत्येकाने काँग्रेसकडून सत्ता-सुख भोगले. मग या गटातील तेजस्वी मंडळाने काँग्रेसची आजची स्थिती सुधारण्यासाठी काय केले? की या तेजस्वी मंडळासही आतून वाटते की, 2024 साली काँग्रेसची कामगिरी निराशाजनक व्हावी. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे.”
“यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे.
अनेक राज्यांत आजही काँग्रेस आहे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत तृणमूलने काँग्रेस फोडली. पण त्यामुळे तृणमूलचे बळ दोन-चार खासदारांनी वाढले इतकेच. ‘आप’चेही तेच आहे. काँग्रेसला खेचायचे व आपण चढायचे ही सध्याच्या विरोधकांची राजकीय चाणक्यनीती आहे. काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. राजकारणातील घरे, खानदाने, बालेकिल्लेही बघता बघता कोसळून जातात.
Story behind samna Editorial : Mamata’s intentions to form a third front are deadly; Mamata’s politics is not Congress-oriented; Shiv Sena’s attack on Mamata
महत्त्वाच्या बातम्या
- OMICRON : ओमायक्रॉनमुळे पंढरपुर विठ्ठल मंदिरात ‘अलर्ट’; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमांची सक्ती
- मुंबई विमानतळावर ८०० जणांची RTPCR चाचणी, पॉझिटिव्ह २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले ;टोपे
- डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या!; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा निर्णय ; मिळणार Z दर्जाची सुरक्षा