• Download App
    आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाइन उपस्थिती । State Cabinet meeting was held at Sahyadri Guest House today; Online presence of Chief Minister Uddhav Thackeray

    आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाइन उपस्थिती

    यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. State Cabinet meeting was held at Sahyadri Guest House today; Online presence of Chief Minister Uddhav Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज (२५ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक झाली.दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली.

    दरम्यान यावेळी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना क्यक्त करत म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण मला सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजिओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.



    रिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळास दिली.तसेच कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.

    कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

    State Cabinet meeting was held at Sahyadri Guest House today; Online presence of Chief Minister Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!