• Download App
    महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत एसटी कर्मचारी संपावर; पुणे, नागपूर, सांगली, जालना, अमरावतीत काम बंद । ST workers on strike in several districts of Maharashtra; Work stopped in Pune, Nagpur, Sangli, Jalna, Amravati

    महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत एसटी कर्मचारी संपावर; पुणे, नागपूर, सांगली, जालना, अमरावतीत काम बंद

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे, नागपूर, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यांमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. ST workers on strike in several districts of Maharashtra; Work stopped in Pune, Nagpur, Sangli, Jalna, Amravati

    अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.



    अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद आहेत. बंद मध्ये 1500 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले असून जिल्ह्यातील 350 बस पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर धावत आहेत. जालना येथे अंबडमधील एसटी  कर्मचाऱ्यांनी देखील आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सांगली जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून सांगली मिरज मध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.

    पुणे जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून  नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले आहेत. उद्या पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, भोर, बारामती डेपो बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उस्मानाबादेत एस.टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कळंब वगळता जिल्ह्यातील एकही डेपो सुरू नाही.

    ST workers on strike in several districts of Maharashtra; Work stopped in Pune, Nagpur, Sangli, Jalna, Amravati

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा