• Download App
    मला उमेदवारी दिली म्हणून येवल्यात माफी मागितलीत, पण 40 आमदार गेलेत, मग महाराष्ट्रभर माफी मागत फिरणार का??; भुजबळांचा पवारांना बोचरा सवाल|So will he go around apologizing all over Maharashtra??; Bhujbal's question to Pawar

    मला उमेदवारी दिली म्हणून येवल्यात माफी मागितलीत, पण 40 आमदार गेलेत, मग महाराष्ट्रभर माफी मागत फिरणार का??; भुजबळांचा पवारांना बोचरा सवाल

    प्रतिनिधी

    नाशिक :  शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासन माजले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यातून छगन भुजबळ उमेदवारी देणे ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते.So will he go around apologizing all over Maharashtra??; Bhujbal’s question to Pawar

    पवारांच्या या टीकेला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. मला उमेदवारी दिली म्हणून येवल्यात माफी मागितली, पण 40 आमदार गेलेत.मग संपूर्ण महाराष्ट्रभर माफी मागत फिरणार का??, असा बोचरा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.



    शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणाऱ्या माणिकराव शिंदे यांच्यावर 2020 ला शिस्तभंग करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. असे असतांना त्यांनी तारीख घेतली आणि पवारांना येवल्यात आमंत्रण दिले. येवल्यातील बहुतांशी तरुण माझ्या स्वागताला होते. मात्र जे थकलेले वृद्ध जे काही काम करत नाही ते पवारांच्या सभेला उपस्थित होते, असे ते म्हणाले.

    शिवसेनेत मी नेता होतो. दोन वेळा आमदार आणि महापौर होतो. त्यामुळे मी ऐरागैरा नाही, असे ते म्हणाले.

    तेलगी घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाले आणि माझे उपमुख्यमंत्री पद गेले. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली त्यात मी निर्दोष झालो. मला कारण नसता राजीनामा द्यावा लागला, अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली.

    जुन्नर येवला आणि इतर काही ठिकाणी मला उमेदवारीची गळ स्थानिकांनी घातली होती. म्हणून पवार साहेबांना मला येवल्यात विकासासाठी पाठवा असे सांगितले. त्यामुळे येवल्यात पवारांनी माझी नाही तर मी येवल्याची निवड केली.सुरक्षित मतदारसंघ वगैरे नव्हता पण आपण जे काम केले त्यावर चार वेळेस निवडून आलो असे भुजबळ यांनी सांगितले.

    मी 29 वर्षांपूर्वी अंदाज चुकलो, असे पवारांनी म्हणणे साफ चुकीचे आहे. बारामतीनंतर खरा विकास झाला येवल्यात झाला आहे. येवल्यात माफी मागितलीत, आता महाराष्ट्रभर 50 ठिकाणी तुम्ही माफी मागत फिरणार का? असा बोचरा सवाल भुजबळांनी पवारांना विचारला आहे.

    So will he go around apologizing all over Maharashtra??; Bhujbal’s question to Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस