• Download App
    मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप साठी अर्ज करण्यास सहावी मुदतवाढ । Sixth extension to apply for post-matric scholarship, freeship

    मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप साठी अर्ज करण्यास सहावी मुदतवाढ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास यावर्षीच्या प्रक्रियेत सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. Sixth extension to apply for post-matric scholarship, freeship



    महाडीबीटी पोर्टलद्वारे या दोनही योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता केंद्रशासनाने अंतिम मुदत दिली होती, मात्र राज्य शासनाने काही शिक्षण कोर्सेसचे अंतिम प्रवेश अजूनही सुरू असल्याने विशेष प्रयत्नातून 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

    यावर्षीच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत 5 वेळा मुदत वाढ देण्यात आली असून ही सहावी वेळ आहे. या योजनांशी संबंधित विद्यार्थी व पालकांनी 28 फेब्रुवारीच्या आत महाडीबीटी पोर्टलद्वारे आपले अर्ज नोंदवून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

    Sixth extension to apply for post-matric scholarship, freeship

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती