Building Collapsed in Ulhasnagar : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शुक्रवारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महिन्याभरात या भागातली ही दुसरी दुर्घटना आहे. Six dead after Building Collapsed in Ulhasnagar Thane rescue operation underway News And Updates
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शुक्रवारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महिन्याभरात या भागातली ही दुसरी दुर्घटना आहे.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, नेहरू चौक परिसरातील साईसिद्धी इमारतीच्या 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वीही अशीच दुर्घटना
15 मे रोजी उल्हासनगर टाउनशिपमध्ये बेकायदा इमारतीचा स्लॅब कोसळला होता. इमारत चार मजली होती आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब पडला. यानंतर दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबही कोसळत राहिले. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. बचाव पथकाने 11 जणांना बाहेर काढले होते.
Six dead after Building Collapsed in Ulhasnagar Thane rescue operation underway News And Updates
महत्त्वाच्या बातम्या
- काळ्या बुरशीवरील अम्फोटेरेसीन बी इंजेक्शन, वैद्यकीय साहित्याला आयजीएसटीमधून पूर्ण सूट, केंद्रीय अर्थंमत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीवर घेतले हे निर्णय
- दोन मुख्यमंत्र्यांतील फरक , नवीन पटनाईक म्हणतात देश संकटात मदत नको, आम्ही आमच्या ताकदीवर लढतो अन् ममतांनी मागितले २० हजार कोटी रुपये
- 81 टक्के जीएसटी करदात्यांना केंद्राचा दिलासा, राज्यांसाठीही काढणार केंद्र 1.58 लाख कोटी कर्ज
- पदोन्नतीतील आरक्षणासाठी प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या प्रसंगी कॉँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
- घटनात्मक मूल्यांपेक्षा ममतादीदींचा अहंकार मोठा, मदत घेऊन आलेल्या पंतप्रधानांकडे फिरवली पाठ