प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बंडात सामील झालेल्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, आपल्या बंडाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी दमबाजी शरद पवार यांनी केल्यावर या दमबाजीवर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दरडावत प्रत्युत्तर दिले आहे. बंडखोर आमदारांच्या केसाला जरी धक्का लागला तर घर गाठणे कठीण होईल, असा स्पष्ट इशारा नारायण राणे यांनी ट्विटरवर दिला आहे.Shivsena splits : sharad Pawar targets rebel MLAs, narayan rane counter attacks Pawar
नारायण राणे यांचे ट्विट
शरद पवार हे सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, असे ते म्हणत आहेत. ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे ट्विट करत नारायण राणे यांनी शरद पवारांना इशारा दिला आहे.
तसेच आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, अशा शब्दांतही नारायण राणे यांनी शरद पवार यांना फटकारले आहे.
शरद पवार यांचे विधान
शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय हा पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी पत्रकारल परिषद घेत बंडखोर आमदारांना इशारा दिला होता.
Shivsena splits : sharad Pawar targets rebel MLAs, narayan rane counter attacks Pawar
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेत फूट : बंडखोरांच्या पाठिशी भाजप; अजित पवार – शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्ये!!; मुनगंटीवारांचा दोन्ही नेत्यांना टोला
- अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 3200 जण ठार, 1000 हून अधिक जखमी, भारत-पाकसह या देशांनी मदत केली जाहीर
- शिवसेनेत फूट : सरकार वाचवण्यासाठी सर्वाधिक तगमग पवार आणि राष्ट्रवादीची; शिवसेना – काँग्रेसचे राष्ट्रवादीवर शरसंधान!!
- आयती मिळालेली सत्ता निसटण्याची काँग्रेस – राष्ट्रवादीला धास्ती; संजय राऊतांच्या वक्तव्यावर मंत्र्यांची नाराजी!!