• Download App
    मोठी बातमी : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी -सुशांतसिंग राजपुतच्या फॅनला अटक। Shiv Sena youth leader and environment minister Aaditya Thackeray threatened to kill by sushantsingh rajputs fan

    मोठी बातमी : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी -सुशांतसिंग राजपुतच्या फॅनला अटक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आदित्य यांना मेसेज करुन ही धमकी दिली आहे. दरम्यान, धमकी देणाऱ्याला मुंबई क्राईम ब्रॅन्चने ताब्यात घेतले आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे. Shiv Sena youth leader and environment minister Aaditya Thackeray threatened to kill by sushantsingh rajputs fan

    34 वर्षीय व्यक्तीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती.



    आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. आरोपीने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजण्याच्या आदित्य यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन कॉल केले. त्यांनी ते घेतले नाहीत.नंतर त्याने मेसेज मधून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    Shiv Sena youth leader and environment minister Aaditya Thackeray threatened to kill by sushantsingh rajputs fan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस