• Download App
    नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल। Ravana of Nashik Horse talk

    नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल

    विशेष प्रतिनिधी

    नंदुरबार: जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सध्या सुरू असलेल्या यात्रा उत्सवातील अश्व प्रदर्शनात नाशिक येथून आलेला रावण घोडा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. काय आहे या घोड्याची वैशिष्ट्ये पाहूया. Ravana of Nashik Horse talk

    सारंगखेडा यात्रेत संपूर्ण राज्यभरातून विविध भागातून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात, मात्र नाशिक येथून आलेला रावण घोडा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. या घोड्याची उंची ६७ इंच असून तो संपूर्ण काळा आहे. त्याच्या कपाळावर एक पांढरा ठिपका आहे.



    त्याला देवमणी कंठ कुकड नगाडा पुठ्ठा अशी शुभ लक्षणे आहे. या घोड्याच्या देखभालीसाठी दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक येथील असद सय्यद यांच्या मालकीच्या घोड्याला तब्बल पाच कोटी रुपयांपर्यंतची मागणी आली आहे, मात्र या घोड्याच्या विक्रीला असद सय्यद यांनी नकार दिला आहे.

    • सारंगखेडा यात्रेतील चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय
    •  घोड्याची उंची ६७ इंच असून तो संपूर्ण काळा आहे
    •  कपाळावर एक पांढरा ठिपका
    • देवमणी कंठ कुकड नगाडा पुठ्ठा अशी शुभ लक्षणे
    • घोड्याला तब्बल पाच कोटी रुपयांपर्यंत मागणी
    • रावण घोड्याला दिवसाला दहा लिटर दूध लागते
    • चणाडाळ, एक किलो गावरान तूप, पाच गावरानी आली, बाजरी, सुकामेवा इतका खुराक लागतो.
    • देखभाल करण्यासाठी ४ लोक आहेत.

    Ravana of Nashik Horse talk

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता