• Download App
    Dr Neelam Gorhe शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार, भगवा फडकणार, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विश्वास

    Dr Neelam Gorhe : शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार, भगवा फडकणार, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विश्वास

    Dr Neelam Gorhe

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: Dr Neelam Gorhe पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. विकास, संवेदनशीलता आणि जनतेशी थेट संवाद या बळावर पुण्यात शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार, असा विश्वास शिवसेनेच्या ( शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला .Dr Neelam Gorhe

    पुण्यात पत्रकार परिषदडॉ . गोऱ्हे यांनी घेऊन पक्षाची निवडणूक रणनीती आणि भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील मंत्री, आमदार आणि वरिष्ठ नेते पुण्यात तळ ठोकणार आहेत. प्रत्येक प्रभागात थेट जनसंपर्कावर विशेष भर दिला जाईल. कोपरा बैठका, जाहीर सभा, घरभेटी आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखण्यात आली आहे.Dr Neelam Gorhe



    या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही लोकाभिमुख योजना असणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. पुण्यातील महिला मतदारांची भूमिका निर्णायक असल्याने, महिला पदाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक प्रभागात लाभार्थी महिलांशी थेट संवाद साधला जाईल. विकासकामांसोबतच कल्याणकारी योजनांच्या जोरावर सरकारचे काम घराघरात पोहोचवण्यावर शिवसेनेचा भर राहील, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

    या प्रचार मोहिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार विजय शिवतारे, शहाजीबापू पाटील, आ. निलेश राणे, शरद सोनवणे, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके यांच्यासह राज्यातील महिला पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होणार आहेत. ज्या प्रभागांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक आहे, तेथे सक्षम, जनाधार असलेले आणि अनुभवी पदाधिकारी, प्रभावी उमेदवार देण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा मोठ्या ताकदीने फडकवणे हेच महायुतीचे अंतिम ध्येय असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

    Shiv Sena to Enter Poll Battle with Full Strength, Saffron Will Fly: Dr Neelam Gorhe

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Maharashtra Assembly : विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

    MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई

    Vijay Wadettiwar : ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा