• Download App
    'सामना'तून शिवसेनेचा ममता दीदींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे सध्याच्या सरकारला बळ देण्यासारखंच! । Shiv Sena targets Mamata Didi in 'Saamana', keeping politics away from Congress is like giving strength to the present government!

    ‘सामना’तून शिवसेनेचा ममता दीदींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे सध्याच्या सरकारला बळ देण्यासारखंच!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांच्या मुंबई दौऱ्यामुळे विरोधी पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षासमोर भक्कम पर्याय उभा करायचा की नाही यावर सर्व विरोधी पक्षांचे एकमत नसताना, कोणाला सोबत घ्यायचे आणि कोणाला बाहेर ठेवायचे यावरून विरोधकांमध्ये वाद सुरूच आहे. Shiv Sena targets Mamata Didi in ‘Saamana’, keeping politics away from Congress is like giving strength to the present government!


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांच्या मुंबई दौऱ्यामुळे विरोधी पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षासमोर भक्कम पर्याय उभा करायचा की नाही यावर सर्व विरोधी पक्षांचे एकमत नसताना, कोणाला सोबत घ्यायचे आणि कोणाला बाहेर ठेवायचे यावरून विरोधकांमध्ये वाद सुरूच आहे.

    पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाने काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेस डीप फ्रीजरमध्ये गेली असल्याचे म्हटले आहे. देशाला सध्या पर्यायी आघाडीची गरज असून विरोधी पक्षांनी ती जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्यावर टाकली आहे, असे एका लेखात म्हटले आहे. पोकळी भरून काढण्यासाठी ते त्यांच्याकडे बघत आहेत. त्या सध्या देशातील विरोधी पक्षांतील सर्वात लोकप्रिय चेहरा आहेत.”

    सामनातून ममता बॅनर्जींवर निशाणा

    काँग्रेसशिवाय विरोधी ऐक्याच्या गप्पा मारणाऱ्या ममता बॅनर्जींना शिवसेनेने सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातील अग्रलेखात लिहिले यावर भाष्य केले आहे. काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवणे म्हणजे फॅसिस्ट शक्तींना मदत करण्यासारखे आहे, असे त्यात म्हटले आहे.

    दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल

    अग्रलेखात म्हटलेय की, काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. 2024 साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे, अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत. ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा!



    काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका

    त्यात पुढे म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या प. बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.

    Shiv Sena targets Mamata Didi in ‘Saamana’, keeping politics away from Congress is like giving strength to the present government!

    महत्त्वाच्या बातम्या

    सामनाचा पूर्ण अग्रलेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

    सामना अग्रलेख – दैवी अधिकाराचा घोळ!

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!