• Download App
    पवारांवर एवढा गंभीर आरोप करून शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहू नये; फडणवीसांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद करावे; रामदास आठवलेंची सूचना|shiv sena should leave MVA after leveling charges against sharad pawar, shiv sena should come back to BJP, asks ramdas athavale

    पवारांवर एवढा गंभीर आरोप करून शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहू नये; फडणवीसांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद करावे; रामदास आठवलेंची सूचना

    प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्र सत्तांतराच्या दिशेने निघाला आहे काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका पाठोपाठ एक अशी राजकीय वक्तव्ये येत आहेत.
    महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत धुसफूस सुरू असून ते सातत्याने एकमेकांवर आरोप करताहेत.shiv sena should leave MVA after leveling charges against sharad pawar, shiv sena should come back to BJP, asks ramdas athavale

    रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणे आणि सत्तेत राहणे परवडणारे नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपासोबत यावे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावे आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमंत्री करावे. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचे भले करावे,” असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.



    अनंत गीते यांचे वक्तव्य योग्य नाही. शरद पवार हे सन्माननीय नेते आहेत. ते कोणत्या एका पक्षाचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असे होत नाही, असा दावा रामदास आठवलेंनी यांनी केला आहे.

    शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे, तर शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचे शिवशक्ती – भीमशक्तीचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन देखील रामदास आठवले यांनी केले आहे.

    shiv sena should leave MVA after leveling charges against sharad pawar, shiv sena should come back to BJP, asks ramdas athavale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस