• Download App
    शिवसेना आमदार संतोष बांगर यांची नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची उन्मत्त भाषा। Shiv Sena MLA Santosh Bangar warns physically asualt Narayan Rane

    शिवसेना आमदार संतोष बांगर यांची नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची उन्मत्त भाषा

    विशेष प्रतिनिधी

    हिंगोली : नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्यावरून महाराष्ट्रात निर्माण झालेले राजकीय महावादळ अजूनच वाढत चालले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारल्याची भाषा केल्याने नारायण राणेंना अटक केली. त्यांना जामीनही मिळाला. त्यानंतर शिवसेना आमदाराचे एक वादग्रस्त वक्तव्य बाहेर आले आहे. Shiv Sena MLA Santosh Bangar warns physically asualt Narayan Rane

    हिंगोली जिल्यातील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आता नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याचे आक्षेपार्ह विधान केले आहे. यावरून भाजपाने आता आक्रमक भूमिका घेतली असून तक्रार देखील दाखल केली जाणार आहे. त्यामुळे राजकारणातील वादग्रस्त खळबळजनक वक्तव्यांची मालिका ही थांबली नसल्याचे दिसून येत आहे.



    नारायण राणेंवर बेछूट टीका करताना शिवसेना आमदार संतोष बांगर नारायण राणे यांना उद्देशून माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अरे तू काय सांगतो कुठे यायचे कुठं यायचे… तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तुझे पोलीस संरक्षण थोडसे बाजूला कर, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केले, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर मला संतोष बांगर म्हणू नको, असे वादग्रस्त विधान केले आहे.

    संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपा नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून संतोष बांगर यांच्याविरोधात भाजपा तक्रार देखील दाखल करणार आहे. हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी ही माहिती दिली. संतोष बांगर यांनी या अगोदर देखील अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.

    Shiv Sena MLA Santosh Bangar warns physically asualt Narayan Rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr Neelam Gorhe : शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार, भगवा फडकणार, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विश्वास

    केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील??

    सुरेश कलमाडींनी डिनर डिप्लोमसीत 64 खासदार जमवून आणले; पण शरद पवारांना ते टिकवून धरता का नाही आले??