• Download App
    शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा|Shiv Sena is now Sonia Sena, BJP's target after naming Deonar Udyan in Mumbai named after Tipu Sultan

    शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेची सोनिया सेना झालेली आहे. भाजपाने कधीही रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये आपली चूक महाराष्ट्रासमोर आणा, अन्यथा आपल्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला जाईल, असा इशारा भाजपचे आमदार अमित साटम यांनी शनिवारी दिला.Shiv Sena is now Sonia Sena, BJP’s target after naming Deonar Udyan in Mumbai named after Tipu Sultan

    समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी देवनार येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव आणला आहे. मात्र यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकारण रंगले आहे.



    यामध्ये महापौर यांनी उडी घेत २०१३ मध्ये शिवाजीनगरमधील रस्त्याला टिपू सुलतान असे नाव देण्याचा ठराव स्थापत्य उपनगरे समिती व महापालिकेत करण्यात आला. त्या वेळी शिवसेनेबरोबर भाजप सत्तेत असताना त्यांनी विरोध केला नव्हता. भाजप सोयीनुसार राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.

    यावर प्रत्युत्तर देत, आपली सुलतानवरील श्रध्दा झाकण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांच्या नावाचा आधार आपण घेतच आहात. माझेही नाव बनावट कागदपत्राच्या आधारे दाखवून आपले खोटे बोलणे रेटत आहात, असा संताप अमित साटम यांनी व्यक्त केला आहे.

    Shiv Sena is now Sonia Sena, BJP’s target after naming Deonar Udyan in Mumbai named after Tipu Sultan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    एकनाथ शिंदेंना अजितदादांची जागा घ्यायची गरजच काय??; मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी झालीय ते बघा!!

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- दादा म्हणजे लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, विधिमंडळात अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर सर्वच भावुक

    Pune Spa Raid : पुण्यात स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी