• Download App
    मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याची हकाटी; ठाकरेंच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!! Sharad pawar's NCP leadership steals agenda of Mumbai marathi manus from shivsena

    मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याची हकाटी; ठाकरेंच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!!

    नाशिक : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हाकाटी आणि ठाकरे यांच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!! असे खरंच आज घडले आहे. मुंबईत “इंडिया” आघाडीची महत्त्वाची बैठक होत असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. त्याला नीती आयोगाच्या मुंबईतल्या बैठकीची पार्श्वभूमी होती. त्या बैठकीत मुंबईचा आराखडा तयार करण्याचे सर्वाधिकार नीती आयोग आपल्या हातात घेत असल्याचा निर्णय झाल्याचा दावा शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. Sharad pawar’s NCP leadership steals agenda of Mumbai marathi manus from shivsena

    या नेत्यांमध्ये खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड होते. या तिघांनीही मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर जाऊन पुष्पांजली अर्पित केली आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे नीती आयोगाचे कारस्थान असल्याची हाकाटी पिटली.

    ही मुंबई 105 हुतात्म्यांच्या हौतात्म्याने महाराष्ट्राला मिळाली आहे. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महाराष्ट्राने मिळवली आहे. आम्ही ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही अशी गर्जना जितेंद्र आव्हाडांनी केली. पण मुंबईकरांवर त्यावेळच्या काँग्रेस सरकारने गोळीबार केला म्हणून 105 जण हुतात्मा झाले. जोशी, गोरे आणि ठाकरे यांनी त्या काँग्रेस सरकार विरुद्ध चळवळ उभारली आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे ढळढळीत सत्य मात्र आव्हाड विसरले.

    मुंबईत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीच्या मुद्द्यावर शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते चिडले होते. वास्तविक नीती आयोगाचे अध्यक्ष सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही प्रेझेंटेशन पाहिले आणि सादर केले. त्यामध्ये मुंबई संबंधीच्या काही आराखड्याचा उल्लेख होता. पण त्याचा अर्थ भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असा काढून राष्ट्रवादीच्या शरदनिष्ठ गटाने हुतात्मा स्मारकावर जाऊन राजकीय स्टंट केला.



    मूळ अजेंडा बाळासाहेबांचा

    वास्तविक मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची ही भाषा 1960 च्या दशकापासून शिवसेना वापरत आली आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची फायर ब्रँड शिवसेना अस्तित्वात होती. मुंबई – मराठी माणूस हा त्यांचा खास अजेंडा होता. या अजेंड्याच्या बळावरच बाळासाहेबांनी मुंबईत कित्येक दशके महापालिकेवर सत्ता गाजवली. त्या सत्तेचा विस्तार त्यांनी मराठी माणूस या अजेंड्यावरच ठाणे महापालिकेपर्यंत केला आणि 1986 नंतर हिंदुत्वाच्या अजेंड्यावर स्वार होत त्यांनी महाराष्ट्र काबीज केला होता. पण त्यापूर्वी 1966 ते 1986 अशी तब्बल 20 वर्षे बाळासाहेबांचा अजेंडा मुंबईतला मराठी माणूस हाच राहिला होता. त्यावेळी बाळासाहेबांचे शिवसैनिक मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा केंद्रातल्या काँग्रेस सरकारचा डाव आहे, अशी सतत हाकाटी पिटायचे.

    वास्तविक मुंबईचे राजकीय आणि आर्थिक आकर्षण काँग्रेस सरकारला तेव्हा होतेच हे नाकारण्यात मतलब नाही. कारण काँग्रेसचे काँग्रेसची सर्व आर्थिक रसद मुंबईतून स. का. पाटील, रजनी पटेल आणि नंतर मुरली देवरा आणि गुरुदास कामत हे नेते पुरवायचे.

    पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या मुद्द्याला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची देखील पार्श्वभूमी होती. त्याकाळी आजच्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण तर मुंबई महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असे वक्तव्य करून बसले होते. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा विषय तसा नवा नाही. फक्त शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांना तो “नवा साक्षात्कार” झाल्याने त्यांनी तो आज मांडला आहे, इतकेच!!

    पण हे करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चक्क ठाकरेंच्या अजेंड्यावर डल्ला मारला आहे, तो देखील मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पुढाकारातून इंडिया आघाडीची बैठक होत असताना!! यात खरे “राजकीय इंगित” दडले आहे.

    मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे मुंबईतल्या मराठी माणूस ही भाषा ठाकरेंची, पण ती भाषा आज सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी वापरली आहे. नीती आयोगाला मुंबईचा आराखडा ठरवण्याचा अधिकारच नाही. मुंबईचा आराखडा ठरविण्याच्या निमित्ताने ते मुंबईतल्या खासदार, आमदार नगरसेवक यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहेत, असा आरोप या तिन्ही नेत्यांनी केला. नेमकी हीच भाषा पूर्वी ठाकरेंचे शिवसैनिक वापरायचे, आज तो अजेंडा चक्क ठाकरेंकडून शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खेचून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    मुंबई महापालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होतील??, हे अजून तरी सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात मुंबईच्या मिठी नदीतून समुद्रात बरेच राजकीय पाणी वाहून जायचे आहे. पण दुसरा कोणताच अजेंडा सापडला नाही, तर एक अजेंडा हाताशी असलेला बरा असे म्हणून शरदनिष्ठ राष्ट्रवादीने ठाकरे गटाच्या मूळ अजेंड्यावर डल्ला मारला आहे, हे हुतात्मा स्मारकावर राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांनी वाहिलेल्या फुलांचे सांगणे आहे!!

    Sharad pawar’s NCP leadership steals agenda of Mumbai marathi manus from shivsena

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!