• Download App
    sharad Pawarपवारांची "डबल गेम"; एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवरच जबाबदारी ढकलली!!

    पवारांची “डबल गेम”; एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवरच जबाबदारी ढकलली!!

    नाशिक : एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलली, अशी पुन्हा एकदा पवारांनी “डबल गेम” खेळली.

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवार गटाने ताबडतोब दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू केली. पण त्याचवेळी काहीही करा, पण सत्ता कुठल्याही पवारांनीच भोगा आणि जबाबदारी इतरांवर ढकला, अशी “गेम” करून सुनेत्रा पवारांचा शपथविधी घडविण्यात आला. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतली, पण त्यांना मदत करणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर मात्र पवार कुटुंबातल्या रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. सुनेत्रा पवार यांना फक्त 35 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यांनी सह्या दिल्या. मग उरलेले पाच आमदार कोण??, त्यांना सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व द्यायचे नव्हते का??, असा सवाल रोहित पवार यांनी केला. यातून त्यांनी सुनेत्रा पवारांची बाजू उचलून धरली, पण राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर शरसंधान साधले.

    याच दरम्यान सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी सीबीआय चौकशी करायची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी या मागणीला अनुकूलता सुद्धा दर्शविली.



    सरकारी यंत्रणांवर अविश्वास

    पण तरीसुद्धा पवार कुटुंबीयांचे समाधान झाले नाही. पवार कुटुंबीयांमधल्या रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारी यंत्रणांवर अविश्वास दाखविला. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशी आणि तपासावर ठळक प्रश्नचिन्ह लावले. रोहित पवारांनी त्यासाठी तर तीन पत्रकार परिषदा घेतल्या. त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रेझेंटेशन केले. या सगळ्यांचा कटाक्ष सरकारी यंत्रणांवर अविश्वास दाखविण्याचाच होता. तिसऱ्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याचाच दावा केला. त्यानंतर जय पवारांनी सुद्धा सरकारी यंत्रणांवर अविश्वास दाखवणारे ट्वीट केले. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सुरुवातीला सावध भूमिका घेतली, पण आज मात्र रोहित पवारांची बाजू घेत सरकारी यंत्रणांवर अविश्वास दाखवला.

    रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर

    पण त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र सरकारवरच ढकलली. अजित पवारांच्या विमान अपघाता विषयी सरकारी तपास यंत्रणा तपास करत आहेत. पण त्यांच्या तपासात दिरंगाई होत असेल, त्यांनी केलेल्या तपासाचा अहवालच लवकर येत नसेल, तर त्याविषयी संशय निर्माण होईल, असा दावा सुप्रिया सुळे यांनी ट्वीट मधून केला. त्याचबरोबर रोहित पवार यांना सरकारने सुरक्षा यंत्रणा पुरवावी. रोहित पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे, अशी मागणी केली. एकीकडे सरकारी यंत्रणांवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलायची असला प्रकार सुप्रिया सुळे यांनी केला. यातून पवार कुटुंबाची “डबल गेमच” सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली.

    sharad Pawar’s “double game”

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!

    Ajit Pawar Crash Update : अजित पवार अपघात, डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडला, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डेटा रिकव्हरीसाठी कंपनीकडे विचारणा

    Chandrapur : काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना इशारा- चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही; दोन्ही पक्षांतील संबंधांवर प्रश्नचिन्ह