• Download App
    Sharad Pawar दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात "राजकीय काडी"; एकनाथ शिंदेंना शरद पवार घालणार शिंदेशाही पगडी!!

    दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात “राजकीय काडी”; एकनाथ शिंदेंना शरद पवार घालणार शिंदेशाही पगडी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही. आता हे दोन्ही विषय एकत्र आणून दिल्लीतले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गाजवले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

    पुण्यातल्या सरहद संस्थेच्या वतीने होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार होणार आहे. सरहद संस्थेने एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामगिरीची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेतली जाणार आहे.

    पाच लाख रुपये रोख आणि शिंदेशाही पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप असून ही शिंदेशाही पगडी शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या मस्तकावर ठेवणार आहेत. पवारांनी आत्तापर्यंत अनेकांना टोप्या घातल्या, पण एकनाथ शिंदेंना मात्र ते शिंदेशाही पगडी घालणार आहेत.

    दिल्लीच्या साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा सत्कार ठेवण्याचे राजकीय औचित्य सरहद संस्थेने दाखविले आहे. कारण त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस या संमेलनात विशिष्ट वेळेला हजेरी लावणार आहेत.

    महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार शरद पवारांच्या हस्ते घडवून आणण्याचे राजकीय औचित्य साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी साधले आहे.‌ या सत्काराच्या निमित्ताने पवारांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचबरोबर शिंदे – फडणवीसांमधली मतभेदांची तथाकथित दरी रुंदवायची संधी पवार साधून घेणार असल्याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    Sharad Pawar to facilitate eknath shinde in Akhil Bhartiya Marathi sahitya sammelan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस