प्रतिनिधी
बारामती : महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक आहेत. चहापानासाठी ढाब्यावर जाण्यासारखे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे चित्र नाही, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीतल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना ढाब्यावर जेवायला न्या. त्यांना चहापाणी करा, असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीतून महाराष्ट्रातल्या पत्रकारांची पाठराखण केल्यामुळे पत्रकारांचे बळ वाढले आहे. Sharad pawar supports marathi journalists, claims their honesty
एकीकडे महाराष्ट्रातल्या पत्रकारांना पाठबळ देताना दुसरीकडे मात्र शरद पवारांनी आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीला प्रदूषण मंडळाने दिलेल्या नोटीशीवर बोलण्यास नकार दिला.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला प्रदूषण नियंत्रक मंडळाने नोटीस बजावली. त्यावर आक्रमक होत आमदार रोहित पवारांनी दोन बड्या नेत्यांच्या मुळे ही कारवाई झाल्याचा आरोप केला पण रोहित पवारांच्या या आरोपावर बोलायला पवारांनी बारामतीतल्या पत्रकार परिषदेत नकार दिला.
रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे शरद पवार हे या कारवाईसंदर्भात कठोर भूमिका घेतील, असा अंदाज पत्रकारांनी वर्तविला होता परंतु पवारांनी याबाबतीत पत्रकारांना चकविले. बारामती ॲग्रोवरच्या कारवाईबाबत आक्रमक न होता, उलट पवारांनी त्यावर न बोलणे टाळले. पवारांची यामागे दुर्लक्ष करण्याची रणनीती असल्याचे असल्याच्या बातम्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी दिल्या.
बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार
आपल्याविरोधात बातमी येऊ नये, यासाठी पत्रकारांना चहा पाजण्यासाठी ढाब्यावर घेऊन जा, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळे यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांची पाठराखण केली. पवार म्हणाले, की, ‘महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती. चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही.
ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण नको
राज्यात सध्या मराठा आरक्षणाबाबतचे आंदोलन जोर धरत आहे. या आंदोलनावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी ते आंदोलन, उपोषण करत आहेत. राज्य सरकारने त्यांना शब्द दिलेला आहे की आम्ही त्यांचा प्रश्न सोडवू. तसंच ओबीसींना वाटतं की त्यांच्यातील आरक्षण इतर कोणी घेऊन नये, याचीही नोंद राज्य सरकारला घ्यावी लागेल. याबाबतही काही निर्णय घेऊ, असा विश्वास केंद्र सरकारने दिला आहे. मराठा समाजाला जी आश्वासनं दिली आहेत, त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेतं हे ३०-३५ दिवसांत कळेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा काय होईल हे आज सांगता येणार नाही.’
Sharad pawar supports marathi journalists, claims their honesty
महत्वाच्या बातम्या
- कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा
- Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक सुवर्ण, पुरुष संघाने केला विश्वविक्रम
- इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण
- राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या जाणून