• Download App
    MVA Finalizes Sharad Pawar for Rajya Sabha; Congress, Sena (UBT) Extend Supriya sule Support VIDEOS राज्यसभेसाठी मविआतर्फे शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर पाठिंबा, सुप्रिया सुळेंची माहिती

    Supriya Sule : राज्यसभेसाठी मविआतर्फे शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर पाठिंबा, सुप्रिया सुळेंची माहिती

    Supriya Sule

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Supriya Sule राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही अधिकृत घोषणा केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सोशल मीडियाद्वारे महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार उद्या स्वतः अर्ज भरण्यासाठी विधानमंडळात जाण्याची शक्यता कमी असून, निवडणूक अधिकारी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.Supriya Sule

    पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीला कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आभार व्यक्त केले. सुळे म्हणाल्या, कालच जयंत पाटील आणि मी उद्धव साहेब यांची भेट घेतली. त्यानंतर आज कॉंग्रेस पक्षाने देखील मोठ्या मनाने शरद पवार साहेबांना ही संधी दिली त्यासाठी आम्ही आभारी आहोत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत. महाराष्ट्रात जेव्हा आव्हान येतात तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी एकत्र लढत असतो.Supriya Sule



    या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ तसेच विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यसभा ही आम्हाला मिळावी अशी इच्छा आम्ही व्यक्त केली होती. मात्र ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही देखील भूमिका कॉंग्रेस पक्षाची होती. शरद पवार यांच्या सारखे नेतृत्व आणि त्यांचा जो अधिकार आहे, त्यानुसार सविस्तर स्वरूपात कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांसोबत आम्ही चर्चा केली. राहुल गांधी यांच्यासोबत देखील चर्चा झाली. त्यानंतर आमचे प्रभारी आणि जीएसओ यांच्यासोबत चर्चा झाली आणि कॉंग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांना पाठिंबा जाहीर केला.

    दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी प्रत्यक्ष विधानमंडळात उपस्थित राहू शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळाचे अधिकारी उद्या त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन अर्ज दाखल करण्याची रीतसर प्रक्रिया पूर्ण करतील आणि त्यांना गोपनीयतेची शपथ देतील, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.

    MVA Finalizes Sharad Pawar for Rajya Sabha; Congress, Sena (UBT) Extend Supriya Sule Support VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Missing Women : 2025 मध्ये राज्यात 13515 महिला, अल्पवयीन मुली अजूनही बेपत्ता; महिला, मुलींच्या शोधावर ठरेल पोलिस ठाण्यांचे रँकिंग

    महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ, विधान परिषदेत चिंता व्यक्त

    शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवारी!!